बुलडाणा - शेगाव येथील साईबाई मोटे रुग्णालयामध्ये प्रसुती झालेल्या महिलेचा अहवाल कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तरीही रुग्णालय प्रशासनाने महिलेला सूटी दिल्याने चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा चौकशी अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा शल्य चिकित्सकांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
कोरोनाविरोधातील लस ही 60 वर्षाहून अधिक वयाच्या नागरिकांना देण्यात येत आहे. ही माहिती देण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी 1 मार्चला पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांकडून झालेल्या चुकीबद्दल जिल्हा आरोग्य विभागाने चौकशी समिती स्थापन केली आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर जबाबदारांवर कारवाई केली जाणार आहे.
हेही वाचा-स्पेक्ट्रम खरेदीत जिओची बाजी; केंद्र सरकारला मिळाले तब्बल ७७,८१५ कोटी रुपये!
रुग्णालय प्रशासनाने असे केले होते दुर्लक्ष
संग्रामपूर तालुक्यातील एकलारा येथील महिला 15 फेब्रुवारीला शेगाव येथील साईबाई मोटे रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झाली होती. 16 फेब्रुवारीला या महिलेचा कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आला. 16 फेब्रुवारीला या महिलेवर सिझेरीअन करून प्रसुती करण्यात आली. या महिलेवर शेगावच्या सामान्य रुग्णाच्या वार्डमध्ये उपचार करण्यात आले. दरम्यान या महिलेच्या कोरोना चाचणीचा अहवाल 19 फेब्रुवारीला पॉझिटिव्ह आला. तरीही दुसऱ्याच दिवशी म्हणजे 20 फेब्रुवारीला या कोरोना बाधित महिलेला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. सुट्टी दिल्यावर ही महिला गावी निघून गेली. कोरोनाबाधित महिलेला सुट्टी दिल्याचा प्रकार रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांना धक्का बसला. तोपर्यंत ही महिला सुमारे 200 नागरिकांच्या संपर्कात आली होती.
हेही वाचा- 'जॅक मा'ने गमाविला चीनमधील श्रीमंताच्या यादीतील अव्वल क्रमांक