ETV Bharat / state

बुलडाण्यातील धाड येथे अल्पवयीन बालिकेवर सामूहिक बलात्कार; तिघांना अटक, दोन फरार

१४ वर्षीय बालिकेवर पाच तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुलडाण्यातील धाड येथे घडली. पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघांना अटक केली आहे, तर इतर तीन आरोपी फरार आहेत.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Aug 22, 2019, 11:51 PM IST

बुलडाणा - बहिणीकडे आलेल्या १४ वर्षीय बालिकेवर पाच तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री उघडकीस आली आहे. या घटनेनंतर बालिकेच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघांना अटक केली आहे. तर इतर तीन आरोपी फरार आहेत. आरोपींना न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अल्पवयीन बालिकेवर सामूहिक बलात्कार

पीडित बालिका बुलडाणा जिल्ह्यातील मोळा तालुका मेहकर येथून धाड बस स्थानकावर आपल्या बहिणीकडे जाण्यासाठी आली. बालिकेला एकटी पाहून आरोपी राहुल लोखंडे याने तिला आपल्या मोटरसायकलवर बळजबरीने बसवले. त्यानंतर जवळच्या करडी धरणाच्या क्षेत्रात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. शिवाय या ठिकाणी फोन करून आरोपी सागर गुजर, अहाय पवार, शुभम पांदे आणि गणेश जाधव या मित्रांना बोलावले. त्यांनीही पीडितेवर आळीपाळीने अत्याचार केला.

घटनेची तक्रार पोलिसात केल्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून यातील मुख्य आरोपी राहुल लोखंडे याच्यासह शुभम पांदे व गणेश जाधव या तिघांना अटक केली. तर सागर गुजर आणि अहाय पवार हे आरोपी फरार आहेत. सर्व आरोपींविरुद्ध पॉस्को कायद्यासह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तिन्ही आरोपींना बुलडाणा जिल्हा न्यायालयासमोर उभे करण्यात आले. पोलिसांकडून मागितलेल्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीपैकी न्यायालयाने आरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Intro:Body:बुलडाणा: बहिणीकडे आलेल्या १४ बालिकेला पडवून नेवून ५ तरुणांनी बलिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी 21 ऑगस्टच्या रात्री उघडकीस आली आहे.. या घटनेनंतर या बालिकेच्या कुटुंबीयांनि पोलिसात तक्रार नोंदवली असून याप्रकरणी पोलिसांनी मुख्य मुख्य आरोपीसह दोघांना अटक केली असून, इतर तीन आरोपी सध्या फरार आहे.सदर तीन आरोपींना न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे..

आपल्या बहिणीकडे बुलडाणा जिल्ह्यातील मोळा तालुका मेहकर येथून धाड बस स्टैंड वर आलेल्या 14 वर्षीय बालिकेला 20 ऑगस्ट रोजी बालिकेला एकटी पाहून आरोपी राहुल लोखंडे यांनी सदर बालिकेला आपल्या मोटरसायकलवर बळजबरीने बसवुन जवळच्याच करडी धरणाच्या क्षेत्रात नेऊन तिच्यावर आत्याचार केला तसेच या ठिकाणी फोन करून आरोपी सागर गुजर अहाय, पवार शुभम पांदे आणि गणेश जाधव या मित्रांना बोलावून घेऊन पीडितेवर आळीपाळीने सर्वांनी जबरी अत्याचार केला या घटनेची फिर्याद पोलिसात केल्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून यातील मुख्य आरोपी राहुल लोखंडे याच्यासह शुभम पांदे व गणेश जाधव या तिघांना अटक केली आहे तर सागर गुजर आणि अहाय पवार हे आरोपी सध्या फरार आहेत सर्व आरोपींविरुद्ध पॉस्को कायद्यासह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर तिन्ही आरोपींना बुलडाणा जिल्हा न्यायालयासमोर उभे केले असता पोलिसांकडून मागितलेल्या 7 दिवसाच्या पोलीस कोठडी पैकी न्यायालयाने आरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे..

बाईट - डॉ. संदीप पखाले, (अप्पर पोलीस अधिक्षक,बुलडाणा)

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.