ETV Bharat / state

कारगिल युद्धात जिंकलो मात्र, प्रशासनासमोर हरलो; माजी सैनिकाचा टाहो - buldana

जमीन न मिळाल्यामुळे माजी सैनिक देविदास माने हे २५ जानेवारीला प्रशासनाच्या विरोधात जीवित समाधी घेवून आंदोलन करणार होते. मात्र, या आंदोलनास त्यांनी तुर्तास स्थगिती दिली आहे. मी देशसेवा केली आणि कारगिल युद्धात देशाला विजय मिळवून दिला. मात्र, प्रशासनासमोर हरलो आहे, असा टाहो त्यांनी फोडला.

buldana
सैनिक
author img

By

Published : Jan 26, 2020, 12:42 PM IST

Updated : Jan 26, 2020, 7:31 PM IST

बुलडाणा- चिखली तालुक्यातील सवणा येथील सेवानिवृत्त सैनिक गेल्या २०११ पासून केवळ ५ गुंठे जमिनीसाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहे. मात्र, जमीन न मिळाल्यामुळे ते २५ जानेवारीला प्रशासनाच्या विरोधात जीवित समाधी घेवून आंदोलन करणार होते. मात्र, या आंदोलनास त्यांनी तुर्तास स्थगिती दिली आहे. मी देशसेवा केली आणि कारगिल युद्धात देशाला विजय मिळवून दिला. मात्र, प्रशासनासमोर हरलो आहे, असा टाहो माजी सैनिक देविदास माने यांनी फोडला.

कारगिल युद्धात जिंकलो मात्र, प्रशासनासमोर हारलो...

तालुक्यातील सवणा येथील १९६५ ला जन्मलेले देविदास माने यांनी जवळपास १७ वर्ष सैन्यात राहून देशसेवा केली. यात प्रामुख्याने १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात देखील घातक कामांडो सेक्शनमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत ते युद्ध लढले आणि त्यांनी भारताला युद्धात विजय मिळवून दिला. युद्धात देशाचे अतोनात नुकसानही झाले होते. बरेच सैनिक शहीद झाले. परंतु, जाता जाता त्यांनी देशवासियांना गर्वाने मान उंच ठेवून आनंदोत्सव दिला होता. त्यानंतर माने यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी सैन्य सेवेतून निवृत्ती मिळवली.

सेवानिवृत्त झालेल्या भूमिहीन सैनिकांना त्यांच्या पुनर्वसनासाठी इ-क्लासमधील जमीन सरकारमार्फत मागणी केल्यावर मिळत असते. देविदास माने यांनी ५ गुंठेच जागा देण्याची मागणी केली होती. प्रशासनाकडून रीतसर कार्यवाही झाल्यावर त्यांना ती मिळणार होती. वर्ष २००५ मध्ये चिखली तहसीलदार यांच्या मार्फत जाहीरनामाही करण्यात आला. परंतु, गत १० वर्षांपासून मिळणार असणाऱ्या जमिनीसाठी ते प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहे. महसूल विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे हा वीर योद्धा म्हातारपणी हतबल झाला. त्यांनी परत ९ जानेवारी रोजी वरिष्ठांना निवेदन देऊन ५ गुंठे जमीन देण्याची मागणी केली आहे. न्याय न मिळाल्यास २५ जानेवारीच्या रात्री ते जीवित समाधी घेतील, असा इशारा त्यांनी दिला होती. मात्र, माने यांनी काही कारणास्तव आंदोलनाच्या निर्णयावर स्थगिती दिली आहे.

याबाबत चिखली तहसीलदार अजितकुमार येळे यांनी तर शासकीय जमीन न देण्याबाबत शासनाचे आदेश असल्याचे सांगितले. मात्र, कारगिल युद्धात सहभाग घेतल्यामुळे विशेष बाब म्हणून सैनिक माने यांना जमीन देण्याबाबत प्रस्ताव पाठविल्या जाईल, असे सांगत सवणा ग्रामपंचयातीचा नाहरकत ठराव घेऊन कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे जिल्हा सैनिक कार्यालय यांच्याकडून सवणा ग्रामपंचायतीकडून माने यांना देण्यात येत असणाऱ्या ५ गुंठा जमिनीचे नाहरकत बाबतचा ठराव जिल्हाधिकारी यांना पाठविल्याचे जिल्हा सैनिक कल्याण प्रभारी अधिकारी पंजाबराव निकाळे यांनी सांगितले. मात्र, देशासाठी जीव वेशीवर टांगून देशसेवा करणाऱ्या जवानांच्या प्रति प्रशासन किती आदर बाळगतो हे या प्रकारातून दिसून आले.

हेही वाचा- 'कोरेगाव भीमाचा तपास एनआयएकडे देणे दुर्दैवी, केंद्राने यात हस्तक्षेप केला'

Intro:Body:ही करेक्शन केलेली स्क्रिप्ट आहे ही घ्यावी..

कृपया 26 जानेवारी निमित्त पैकेज करावी ही विनंती...

स्टोरी:- कारगिल युद्धात जिंकलो मात्र, प्रशासनासमोर हारलो..शासकीय जमिन न मिळाल्याने माजी सैनिकाचा टाहो..

बुलडाणा:- चिखली तालुक्यातील सवणा येथील सेवानिवृत्त सैनिक गेल्या २०११ पासून केवळ ५ गुंठ्ठे जमिनीसाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवत असूनही जमिनीं न मिळाल्याने ते २५ जानेवारीला प्रशासनाच्या विरोधात जित समाधी घेवून आंदोलन करणार होते मात्र, ह्या आंदोलनास त्यांनी तुर्तास स्थगिती दिलीय देशसेवा करत देशाच्या कारगिल युद्धात जिंकलो मात्र,प्रशासनासमोर हरलोय असा टाहो माजी सैनिक देविदास माने यांनी फोडलाय..

चिखली तालुक्यातील सवणा येथील १९६५ ला जन्मलेले देविदास माने यांनी जवळपास १७ वर्ष सेन्यात राहून देशसेवा केली. यात प्रामुख्याने १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात देखील घातक कामांडो सेक्शन मध्ये आपल्या सहकाऱ्यासोबत हा युद्ध लढला आणि भारतीय सेनेने या युद्धात विजय प्राप्त केलाय. या विजयात देशाचे अतोनात नुकसान होऊन बरेच सैनिक शहिद झाले होते, परंतु जाता जाता त्यांनी देशवासियांना गर्वाने मान उंच ठेवून आनंदोत्सव दिला त्या सैनिकांमधील एक आहे देवीदास माने.. माने यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी सेन्य सेवेतून रिटायरमेंट मिळवली. सेवानिवृत्त झालेल्या भूमिहीन सैनिकांना त्यांच्या पुनर्वसनासाठी इ-क्लास मधील जमीन सरकार द्वारे मांगणी केल्यावर मिळत असते. देविदास माने यांनी ५ गुंठेच जागा देण्याची मागणी केली होती. प्रशासना कडून रीतसर कार्यवाही झाल्यावर त्यांना ती मिळणार होती. वर्ष २००५ मध्ये चिखली तहसीलदार यांच्या मार्फत जाहीरनामा ही करण्यात आले. परंतु गत १० वर्षांपासून मिळणार असणाऱ्या जमिनीसाठी ते प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहे. महसूल विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे हा वीर योद्धा म्हातारपणी हतबल झाला असून शेवटी नैराश्य पदरी पडत असल्याचे पाहून त्यांनी ९ जानेवारी रोजी वरिष्ठांना निवेदन देऊन ५ गुंठे जमिन देण्याची पुन्हा मांगणी केली आहे, न्याय न मिळाल्यास २५ जानेवारी च्या रात्री ते जीवित समाधी घेतील असा इशारा दिला होता यावर त्यांनी आंदोलनाच्या निर्णयावर स्थगियी दिली आहे.याबाबत चिखली तहसीलदार अजितकुमार येळे यांनी तर शासकीय जमिनी न देण्याबाबत शासनाचे आदेश आहे मात्र,कारगिल युद्धात सहभाग घेतल्यामुळें विशेष बाब म्हणून सैनिक माने यांना जमिनी देण्याबाबत प्रस्ताव पाठविल्या जाईल सांगत सवणा ग्रामपंचयातचा नाहरत बाबत ठराव घेऊन कारवाई करण्यात येईल असे सांगितले तर दुसरीकडे जिल्हा सैनिक कार्यालय यांच्याकडून सवणा ग्रामपंचायतकडून माने यांना देण्यात येत असणाऱ्या ५ गुंठा जमिनीचे नाहरकत बाबतचा ठराव जिल्हाधिकारी यांना पाठविल्याचे जिल्हा सैनिक कल्याण प्रभारी अधिकारी पंजाबराव निकाळे यांनी सांगितले मात्र, देशासाठी जीव वेशीवर टांगून देशसेवा करणाऱ्या जवानांच्या प्रति प्रशासन किती आदर बाळगतो हे दिसून येतो.वसीम शेख इटीव्ही भारत बुलडाणा

बाईट:- 1)देविदास माने , माजी सैनिक सवणा ( टोपी वाले)
2) अजितकुमार येळे ,तहसीलदार, चिखली( चषम्यवाले) यांचे 2 बाईट आहे..आपल्या परीने घेणे

3) पंजाबराव निकाळे ,प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,बुलडाणा

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
Last Updated : Jan 26, 2020, 7:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.