बुलडाणा - कोरोणाच्या संकटानंतर राज्यावर पुन्हा एकदा ढगफुटी, आणि अतिवृष्टीचे मोठे संकट ओढवले आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील सातारा, सांगली, कोल्हापूर, चिपळूण यासह अनेक जिल्ह्यामध्ये पावसाने आपले रौद्ररूप दाखवल्याने शेकडो नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय. अनेकांचे संसार यामध्ये वाहून गेले आहेत. गावेच्या - गावे निसर्गाच्या प्रकोपामुळे नेस्तनाभूत झालीयेत. त्यामुळे तेथील नागरिकांना धीर देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज असल्याने सामाजिक भान ठेवत, आपले कर्तव्य समजून बुलडाणा जिल्हा शिवसेनेकडून मोठी मदत या पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी करण्यात आली आहे. जवळपास पंधराशे क्विंटल अन्न धान्य, 13 मालवाहू एसटी बसेसेद्वारे आज गुरुवारी 29 जुलै रोजी पाठवण्यात आले. मेहकर येथून जिल्ह्याचे संपर्कप्रमुख तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी झेंडा दाखवत मालवाहू बसेस रवाना करण्यात आल्या.
उध्दव ठाकरेंच्या आवाहनाला शिवसैनिकांचा प्रतिसाद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला होणारा सर्व खर्च टाळून, राज्यातील शिवसैनिकांनी त्या पैशाची पूरग्रस्तांना मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्यानुसार हा मदतीचा हात दिला जातोय...
एका दिवसात केला 50 लाख रुपंयांचे अन्य धान्य-
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिलेल्या आवाहनानुसार बुलडाणा जिल्ह्यातील शिवसैनिकांनी एका दिवसात पंधराशे क्विंटल धान्य आणि किराणा साहित्य गोळा केले आहे. ज्यामध्ये गहू ,तांदूळ, आटा , डाळ, तेल, मीठ, यासह यातील सर्व साहित्य घेऊन 50 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे साहित्य एसटी महामंडळाच्या मालवाहू 13 बसेसमधून पाठवण्यात आले. चिपळूनसाठी मालवाहू बसेस आज गुरुवारी मेहकर येथून रवाना झाल्या आहेत. यावेळी शिवसेनेचे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी हिरवा आणि भगवा झेंडा दाखवत या बसेस रवाना केल्या आहेत. यावेळी आमदार संजय रायमुलकर , आमदार संजय गायकवाड , जिल्हाध्यक्ष जालींदर बुधवत, नरेंद्र खेडेकर, यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन ही मदत गोळा केली आहे. ही मदत एका दिवसात केवळ शिवसैनिकांनी केली असून, येत्या काही दिवसात संपूर्ण जिल्ह्यातूनदेखील पुन्हा एकदा भरीव मदत पाठवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - Sri Lanka vs India, 3rd T20I : निर्णायक झुंजीला सुरुवात, कोण जिंकणार मालिका?