बुलढाणा : महाराष्ट्रात सातत्याने शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विजेच्या वेळेच्या संदर्भात अनेक आंदोलने झालीत. परंतु अद्यापही शेतकऱ्यांना मिळणारी वीज ही काही तासांपूर्ती (government neglect) असते. तर काहींना मिळते ती रात्रीच्या वेळेला, तर काहींना तासन तास बघावी लागते (Farmers suffering due to load shedding) विजेची वाट! अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना येत असलेल्या समस्यां जाणून घेण्यासाठी रात्रीला शेतकऱ्यांच्या बांधावर जात, त्यांच्या समस्या काय? याचा आढावा 'ईटिव्ही भारतने' घेतला आहे. (National Energy Conservation Day)
काळोखात पुरवली जाते विज : संपुर्ण महाराष्ट्रात उद्याेग धंदे, कारखाने, वसाहती, सरकारी व खाजगी कार्यालये या सगळ्यांना विज पुरवली जात असतांना, मात्र केवळ शेतकऱ्यांनाच शेतीला पाणी द्यायला, रात्रीच्या गर्द काळोखात विज का पुरवली जाते, असा हा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. मात्र, जगाचा पोशिंदा असलेल्या या शेतकऱ्याचेच म्हणणे ऐकुण घ्यायला कुणीच नाही. आजपर्यंत रात्री शेतात पाणी द्यायला जाणाऱ्या शेतकऱ्यावर जंगली प्राणी, साप, विंचु यांचे अनेक हल्ले होऊन, त्यात त्यांनी जीव गमावला. तरीसुध्दा अद्यापही त्यांच्या गळ्याभोवतीचा लोडशेडींगचा फास सुटलेला नाही.
शेतकऱ्यांच्याच नशिबी का?: परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर कसेबसे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आणि पुन्हा एकदा जोमाने गहू हरभऱ्याची उसनवारी कर्ज घेऊन पेरणी केली. परंतु शेतकऱ्यांच्या समस्या काही सुटता सुटेना. अजूनही विजेचा तुटवडा हा शेतकऱ्यांच्याच नशिबी का येतो..? असा प्रश्न आहे.
कधीच न संपणार कोडं : शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून मोठा खर्च त्यांच्यावर करत असते. परंतु त्यांना लागणाऱ्या महत्त्वाच्या सुविधा पुरवण्यात सरकार अपयशी होत आहे का? असा प्रश्न पडत आहे. आसमानी सुलतानी त्यानंतर शासकीय धोरण यात शेतकऱ्यांना कोण कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागतं, याचा अंदाज सामान्य व्यक्ति बांधु शकत नाही आणि हे कधीच न संपणार कोडेचं ठरत आहे.