ETV Bharat / state

बुलडाणा : पंचनामे पूर्ण होऊनही सरकार स्थापन न झाल्याने नुकसानभरपाई रखडली - बुलडाणा शेती पंचनामे

सरकार स्थापन झाले नसल्याने शेतकरी अजूनही नुकसानभरपाईच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्ह्यातील सव्वा सहा लाख हेक्टर क्षेत्र पावसाने बाधित झाले असून साडेसहा लाख शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. दरम्यान, मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने ४७८ कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे.

शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत
author img

By

Published : Nov 16, 2019, 2:17 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. प्रशासन स्तरावर पंचनामे पूर्ण होत आले असले तरी सरकार स्थापन झाले नसल्याने शेतकरी अजूनही नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील सव्वा सहा लाख हेक्टर क्षेत्र पावसाने बाधित झाले असून साडेसहा लाख शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. दरम्यान, मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने ४७८ कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे.

शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत
यंदा परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. भिजलेली आणि कुजलेली सोयाबीन कवडीमोल भावाने विकावी लागत आहे. अनेक ठिकाणी अद्यापही शेतात ट्रॅक्टर, मळणीयंत्र जाऊ शकत नसल्याचे चित्र आहे. पीके काढणीला आली असताना संपूर्ण खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे. आर्थिक नुकसान झाल्याने रब्बीची पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. विमाकंपन्या नुकसान भरपाई देणार की नाही याची चिंता शेतकऱ्यांना लागून आहे. मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती असताना सुद्दा विमा काढलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नव्हती.

हेही वाचा - ओल्या दुष्काळाचा खामगाव तालुक्यात पहिला बळी, दीड लाखांचे होते कर्ज

ज्या सरकारकडे मदत मागायची आहे ते सरकारच अद्याप स्थापन झालेले नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे अनुदान कित्येक शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेले नाही. आपले अनुदान जमा झाले की नाही, हे पाहण्यासाठी शेतऱ्यांना बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.

Intro:Body:बुलडाणा:- बुलडाणा जिल्ह्यातील परतीचा पाऊस अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान केले नुकसानीची पंचनामे सर्वे झाले परंतु सरकार स्थापन झाले नाही त्यामुळे नुकसानभरपाईचे मदत अजून पर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाही.

जिल्ह्यातील शेतकरी परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत तर दुसरीकडे नेते सत्तास्थापनेच्या प्रतिक्षेत आहेत. यंदा परतीच्या पावसाने खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन झालेल्या नुकसानाचे सर्वे झाले, पंचनामे तयार झाले आता मदत कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. यंदाचा संपूर्ण खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे. भिजलेली आणि कुजलेली सोयाबीन कवडीमोल भावाने विकावी लागत आहे. अनेक ठिकाणी अद्यापही शेतात ट्रॅक्टर, मळणीयंत्र जाऊ शकत नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी थ्रेशर व ट्रॅक्टर हे शेतरस्त्यात फसत असून ते जेसीबीच्या साह्याने काढण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे. संपूर्ण खरीप हंगाम हातातून गेला आता रब्बीची पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.विमाकंपनी नुकसान भरपाई देणार की मग मागच्या वर्षीचीच पुनरावृत्ती होणार अशीही चिंता शेतकऱ्यांना लागून आहे. मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती असताना सुद्दा विमा काढलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. यावर्षी विमा काढलेल्या आणि विमान काढलेल्या अशा सर्वच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांना मदत मिळणे आवश्यक आहे. ज्या सरकारकडे मदत मागायची आहे ते सरकारच अद्याप स्थापन झालेले नाही, त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. प्रधान मंत्री किसान सन्मान योजनेचे अनुदान कित्येक शेतकऱ्यांना मिळज्ञले नाही. काहींना पहिला हप्ता, काहींना दुसरा तर काहींना तिसरा हप्ता मिळालं नाही. आपले अनुदान जमा झाले की नाही, हे पाहण्यासाठी शेतऱ्यांना बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. एकंदरीत ओढावलेली बिकट परिस्थिती पाहता आता सर्व शेतकऱ्यांना मदतीची प्रतिक्षा लागुन आहे.

बाईट:- गुलाबराव शेळके शेतकरी,सव ( व्हाईट शर्ट)

बाईट:- योगेश शेळके शेतकरी,सव ( गळ्यात रुमाल)

-वसीम शेख, बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.