ETV Bharat / state

Ravikant Tupkar : 'राज्यातील शेतकरी वाऱ्यावर अन् राज्य सरकार अयोध्या दौऱ्यावर' - अवकाळी पावसाचा फटका

रोम जळत असताना रोमचा राजा बिगुल वाजवत होता. तसा महाराष्ट्र झाला आहे. वादळी वारा, गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर आहेत. सरकार शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी वाऱ्यावर सोडत असल्याची टीका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. ते आज बुलडाण्यात बोलत होते.

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar
author img

By

Published : Apr 9, 2023, 7:21 PM IST

राज्यातील शेतकरी वाऱ्यावर अन् राज्य सरकार अयोध्या दौऱ्यावर- रविकांत तुपकर

बुलडाणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी टीका केली आहे. शेतकरी अवकाळी पाऊस, गारपीटीनेग्रस्त असतांना मुख्यमंत्री दौरे करत असल्याचा प्रहार रविकांत तुपकर यांनी केला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असुन सरकार दौऱ्यात व्यस्त असल्याची टीका तुपकर यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले : शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी सरकार वाऱ्यावर सोडत असल्याची टीका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. ते आज बुलडाण्यात बोलत होते. रोम जळत असताना रोमचा राजा बिगुल वाजवत होता. तसा महाराष्ट्र झाला आहे. वादळी वारा, गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र राज्य सरकारकडे या प्रश्नाकडे पहायाला वेळ नसल्याचेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांना मदत करा : सरकार शेतकऱ्यांची मदत करण्या ऐवजी खासदार, आमदारांसह अयोध्या दौऱ्यावर आहे. भगवान रामांचे दर्शन पुढच्या महिन्यात घेता आले असते. राम मदिरांची पाहणी पण करता आली असती. आगोदर शतकऱ्यांना मदत मिळणे गरजेचे असल्याचे शिंदे म्हणाले. पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत करणे हे सरकारचे काम आहे. अन्नदाताच परमेश्वर आहे. अन्नदात्याची पूजा करणे देवपूजा करण्यासारखे असल्याचे तुपकर म्हणाले.

शेतकऱ्यांना मदत करा : जिवंत माणसांना वाऱ्यावर सोडून देवाच्या दर्शनाला जाण्यापेक्षा पुढच्या महिन्यात मुख्यमंत्र्यांना अयोध्येला भेट देता येणे शक्य होते अशी टीका त्यांनी शिंदे सरकारवर केली आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास गारपीटीने हिरावुन घेतला आहे. शेतकऱ्यांना या आर्थिक संकटातुन वाचवणे सरकारची जबाबदारी असल्याचे तुपकर यांनी म्हटले आहे.

अवकाळी पावसाचा फटका : राज्यातील विविध भागाला गारपीट, अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. संभाजीनगर विभागात एका दिवसात तीन जणांचा मृत्यू झाला असून 31 जनावरांचा मृत्यू झाल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घालत आहे. महिनाभरापूर्वी गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले होते, मात्र आता शुक्रवारी पुन्हा अवकाळी पावसाने अनेक गावांतील पिकांची नासाडी झाली आहे. संभाजीनगरच्या प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार आठही जिल्ह्यांत ७ एप्रिल ते ८ एप्रिल दरम्यान सरासरी ४.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक ८.९ मि.मी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाला आहे. तर जालना, नांदेड परभणी, हिंगोली, बीड, लातूर जिल्ह्यातही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. तर, धाराशिव जिल्ह्यात( उस्मानाबदा ) तुलनेने कमी पाऊस पडला आहे.

हेही वाचा - CM DCM Visited Ayodhya : मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतले रामलल्लाचे दर्शन; मंदिर उभारणी कामाची केली पाहणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.