ETV Bharat / state

बेकायदा उत्खनन बंद व्हावे म्हणून शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

माळविहीर येथे सुरू असलेले बेकायदा उत्खनन बंद करण्यात यावे, या मागणीसाठी संदरखेड येथील दोन शेतकरी 25 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

उपोषणकर्ते
उपोषणकर्ते
author img

By

Published : Jan 29, 2020, 2:13 PM IST

Updated : Jan 29, 2020, 3:28 PM IST

बुलडाणा - माळविहीर येथे सुरू असलेले बेकायदा उत्खनन बंद करण्यात यावे, या मागणीसाठी संदरखेड येथील दोन शेतकरी 25 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

बेकायदा उत्खनन बंद व्हावे म्हणून शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण
निलेश गायकवाड, विष्णू गायकवाड, असे त्या शेतकऱ्यांची नावे आहे. त्यांच्या उपोषणाला आज पाच दिवस झाले असून अद्याप प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही.

माळविहीर शिवारात तुकाराम चव्हाण यांच्या गट क्र. 56, 57, 58 ला लागून शेतकरी निलेश गायकवाड, विष्णू गायकवाड यांचे गट क्र. 59 आणि 60 मध्ये शेती आहे. तुकाराम चव्हाण यांच्या गट क्र.56 मध्ये गौण खनिज विभागाने 1.63 आर जमिनीत गौण खनिज उत्खनन व वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे. त्यावर तुकाराम चव्हाण हे या ठिकाणी स्फोट करून उत्खनन करत असतात. पण, गायकवाड यांच्या शेतीला लागून असलेले गट क्र. 57 व 58 मध्ये अवैधपणे स्फोट करून उत्खनन केले जात आहे. त्यामुळे गायकवाड यांच्या शेतात मोठे दगडे, माती येत आहे. यामुळे पिकाचे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे 100 ते 130 फुटांपर्यंत खोदकाम केल्याने शेतीत माती वाहून जाऊ शकते, अशी भीती गायकवाड व्यक्त करत आहेत.

हे उत्खनन बंद करण्यात यावे. यासाठी शेतकरी निलेश गायकवाड, विष्णू गायकवाड यांनी तक्रार अर्ज दिल्यावरही उत्खनन बंद करण्यात आले नाही. हे उत्खननाचे काम बंद करण्यात यावे, या मागणीसाठी निलेश गायकवाड, विष्णू गायकवाड हे शेतकरी 25 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहे.

Intro:Body:बुलडाणा:- मौजे माळविहिर शिवारात शेतीला लागून असलेली खदानीमुळे शेतीला नुकसान होत असल्यामुळें ही खदान बंद करण्यात यावी या मागणी साठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निलेश गायकवाड,विष्णू गायकवाड या दोन शेतकऱ्याने २५ जानेवारी पासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.आज २८ जानेवारी उपोषणास ४ दिवस असून प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही..

मौजे माळविहिर शिवारात तुकाराम चव्हाण यांच्या गट क्र.५६,५७,५८ ला लागून शेतकरी निलेश गायकवाड,विष्णू गायकवाड यांचे गट क्र.५९,६० मध्ये शेती आहे.तुकाराम चव्हाण यांच्या गट क्र.५६ मध्ये गौण खनिज विभागाने १.६३ हे आर जमिनीत गौण खनिज उत्खनन व वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे.त्यावर तुकाराम चव्हाण हे याठिकाणी ब्लस्टिंग करून उत्खनन करीत असून शेतीला लागून असलेले गट क्र.५७,५८ मध्ये अवैध पद्धतीने ब्लस्टिंग करून उत्खनन केल्या जात असून यामुळे शेतीमध्ये मोठं-मोठे दगडे,माती येत आहे यामुळे पिकाचे नुकसान होत आहे.विशेष म्हणजे १०० ये १३० फुटापर्यंत खोदकाम केल्याने शेती वाहून जाऊ शकते म्हणून ही खदान बंद करण्यार यावी याकरिता शेतकरी निलेश गायकवाड,विष्णू गायकवाड यांनी तक्रार अर्ज दिल्यावरही खदान बंद करण्यात आली नाही.ही खदान बंद करण्यात यावी या मागणीसाठी निलेश गायकवाड,विष्णू गायकवाड हे शेतकरी २५ जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहे...

-वसीम शेख,बुलडाणा-
Conclusion:
Last Updated : Jan 29, 2020, 3:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.