बुलडाणा- तालुक्यातील झरी येथे मुलगी पाहायला गेलेल्या भादोला येथील २८ वर्षीय युवकाने नात्यातीलच विवाहितेचा २९ नोव्हेंबरला विनयभंग केला होता. मात्र, घटनेच्या दिवसापासून आरोपी फरार झाला आहे. ग्रामीण पोलिसांनी विविध ठिकाणी शोध घेऊनही अद्याप त्याचा थांगपत्ता लागला नाही. नीलेश समाधान गवई असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून आरोपीच्या नावाची शोधपत्रिका जारी करण्यात आली आहे.
आरोपीने केला नात्यातील महिलेचा विनयभंग
आरोपी हा २८ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील झरी येथे मुलगी पाहण्याकरता गेला होता. तो ज्या नातेवाईकाकडे थांबला त्या कुटुंबातीलच एका विवाहितेचा त्याने विनयभंग केला. तसेच तिला व तिच्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गेल्या 24 दिवसांपासून आरोपी फरार असल्याने, पोलिसांनी अखेर त्याची शोधपत्रिका जारी केली आहे. आरोपी कुठेही आढळून आल्यास सपंर्क करावा असे आवाहन पोलिसांनी यामध्ये केले आहे.