बुलडाणा - अकोला आणि बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवरील मन नदीवर असलेला 100 वर्षापूर्वीचा इंग्रजकालीन पुलाचा काही भाग कोसळला. आज (शुक्रवारी) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. सदरील पुलाच्या बाजूने नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. कंत्राटदाराने जुना पूल कोरून ठेवल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. तर यावेळी पुलावरुन कोंबड्या घेऊन जाणारे बुलेरो वाहनाला अपघात झाला. यामुळे वाहनाचे मागील भाग लटकले होते. तर पूल खचल्याने या राज्यमार्गावरील वाहतून अकोला मार्गे वळविण्यात आली आहे.
कंत्राटदाराने जुन्या पुलाजवळ खोदकाम केल्याने ढासळला पूल -
शेगाव-अकोट राज्य मार्गावरील लोहारा गावाजवळ असलेल्या मन नदीच्या पुलावर इंग्रजकालीन पूल आहे. मात्र, याच ठिकाणी कवठा बॅरेज तयार करण्यात आल्याने या नदीपात्रात पाणी जास्त थांबविले जाणार आहे. यासाठी जुन्या पुलाची उंची वाढविण्यासाठी बाजूनेच नवीन पूल तयार करण्यात येत आहे. मात्र, नवीन पूल तयार करीत असताना कंत्राटदाराने जुन्या पुलाजवळ खोदकाम केले. यामुळे आज शुक्रवारी सकाळी या पुलावरून एक वाहन कोंबड्या घेऊन जात असताना पुलाचा एक भाग पूर्णपणे ढासळला. यामुळे बुलेरो नदीत अडकली होती. तर सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
हेही वाचा - माझ्या भाषेत सांगायचे तर हे छा-छु काम आहे, अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना सुनावले
घटनेनंतर जेसीबीच्या साहाय्याने बुलेरो वाहन काढण्यात आले. मात्र, पुलाचे एक भाग ढासळल्याने या राज्यमार्गावरील वाहतून अकोला मार्गे वळविण्यात आली आहे.