ETV Bharat / state

CM Eknath Shinde in Buldhana: दोन उपमुख्यमंत्री 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाला गैरहजर, मुख्यमंत्र्यांनी 'ही' दिली प्रतिक्रिया - Buldhana Shasan Aaplya Dari Programme

CM Eknath Shinde in Buldhana बुलढाणा जिल्ह्यात आज 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यानंतर त्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (CM Eknath Shinde)

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 6:14 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

बुलढाणा CM Eknath Shinde : जिल्ह्यामध्ये आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या घरी भेट दिली. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकार स्वस्त बसणार नाही. आरक्षण मिळेपर्यंत ज्या योजना आहेत, त्यांचा लाभ मराठा समाजाला मिळत राहील. देवेंद्र फडणवीस लेह लडाखमध्ये आहेत आणि अजित पवार यांना ताप असल्याने ते कार्यक्रमास येवू शकले नाही. आमच्यामध्ये कुठलेही वाद, कुठलाही गैरसमज नाही, असं एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून जालना जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलंय. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, त्यांच्यात आणि राज्यातील दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये कोणताही गैरसमज नाहीय. ते सर्वजण एक चांगली टीम म्हणून काम करत आहेत. राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. जोपर्यंत समाजाला योग्य आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

सरकारी योजना सुरूच राहतील : जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सरकारी योजना सुरूच राहतील. मराठा समाजातील पात्र लोकांना त्याचा फायदा होईल, असेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला (Shasan Aaplya Dari) का उपस्थित नव्हते, असे विचारले असता, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अजित पवार यांनी मला सांगितले की त्यांची तब्येत खराब आहे. ताप उतरला आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सैन्यदलाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लडाखमध्ये आहेत. त्या तिघांमध्ये कोणताही गैरसमज नव्हता. एक चांगली टीम म्हणून ते सर्वजण एकत्र आहेत, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

आंदोलनात पोलिसांचा लाठीचार्ज : जालन्यातील आंतरवली सारटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण लागलं होतं. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात पोलीस कर्मचाऱ्यांसह अनेक आंदोलक जखमी झालेत. पोलिसांनी हिंसाचाराच्या संदर्भात 360 हून अधिक लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.(Buldhana Shasan Aaplya Dari Programme)

हेही वाचा :

  1. CM Eknath Shinde: विरोधकांकडून वर्षभरापासून चेकमेट करण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा
  2. CM Eknath Shinde : शरद पवार बोलतात त्याच्या उलटा अर्थ समजायचा; मुख्यमंत्री शिंदेंचा टोला
  3. CM Eknath Shinde : कलाकारांना संधी देऊन सन्मान करणारे सरकार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.