बुलडाणा: एक मद्यपी एस टी बससमोर आडवा आल्याने एस टी बस चालकाने त्या मद्यपी व्यक्तीला शिवीगाळ करत चांगलाच चोप दिला. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. एखादा मद्यपी दारू पितो आणि सर्व भान विसरून अशी कृती करत असतो. तो चक्क लाल परीसमोर विकृत प्रदर्शन करतो. त्यामुळे संपूर्ण प्रवाशांना देखील त्याने वेठीस धरले हे देखील तो विसरून गेला. व्यसन करणे हे हानिकारक आहे. याबद्दल अनेक वेळा जनजागृती माध्यमाच्याद्वारे केली जाते. पण तरीदेखील भर दिवसा शहराच्या चौकामध्ये अशा घटना घडतात. याला देखील कुठे आवर घालणे गरजेचे आहे आणि अशांना कडक शासन केल्याने पुन्हा अशा घटना घडणार नाही याची देखील दक्षता घेणे गरजेचे आहे.
प्रवाश्यांना मनस्ताप: मद्यपीला समजावूनही तो ऐकण्याचा मनस्थितीत नसल्याने बस चालकाने त्याला बसमध्ये बसवले. यानंतर चालकाने मलकापूर शहर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घडलेला घटनाक्रम सांगितला. या सर्व प्रकारामुळे प्रवाश्यांना चांगलाच मनस्ताप झाला. मद्यपी बस समोर आला नसता तर प्रवाशी वेळेवर घरी पोहचू शकले असते. अशा मद्यपीला चोप दिल्याशिवाय काही पर्याय उरणार नव्हता, अशा प्रवाशांच्या प्रतिक्रिया होत्या. या प्रसंगस्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. प्रवाशांनी या प्रसंगाचे व्हिडीओ चित्रिकरण केले आणि त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल केला. मात्र, या संपूर्ण घटनेमुळे प्रवाश्यांना नियोजित स्थळी पोहोचण्यासाठी उशीर होेऊन त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
चालकाचा पारा चढला अन्: या व्हिडिओमध्ये मद्यपी लालपरी म्हणजेच एसटी बस थांबवत आहे. एसटीचा चालक त्याला विचारणा करत आहे. पण, तो काही सांगायला तयार नाही. त्यावेळी संतापून चालक खाली उतरला. त्याने मद्यपीला बस थांबवण्याचे कारण विचारले. पण तो काही सांगत नव्हता. शेवटी एसटी चालकाचा पारा चढला. त्याने आधी मद्यपीला चांगला चोप दिला. बसमधील प्रवासी बसखाली उतरले. त्यांनीही मद्यपीविरोधात नाराजी व्यक्त केली आणि थेट बस पोलीस स्टेशनमध्ये नेली. मद्यपीविरुद्ध शासकीय कामात अडथळा टाकल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: Sanjay Raut on CM Shinde : शेतकरी मेटाकुटीला, पण सरकारचे वऱ्हाड अयोध्येला; संजय राऊतांची टीका