ETV Bharat / state

नेत्र तपासणीत अपात्र ठरलेल्या चालकाचा परवाना रद्द करून सेवेतून केले बडतर्फ

गवई यांचा चालक परवानाही देखील आरटीओ मार्फत रद्द करण्यात आला आहे. गेल्या २३ महिण्यांपासून त्यांना पगारसुद्धा देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांना परिवार चालवणे कठीण होवून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कामावर रुजू करा, २३ माहिण्याचा पगार द्या या मागणीसाठी गवई यांनी आपल्या कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

उपोषनावर बसलेले गवई कुटुंंब
author img

By

Published : Sep 4, 2019, 11:58 PM IST

बुलडाणा - डॉक्टरांच्या तपासणीत डोळ्यातील नजर कमी झाली म्हणून वाहकाच्याच परिवारात अंधार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जळगाव जामोद आगारातील वाहक सिद्धार्थ गवई यांच्या दरवर्षीच्या आरोग्य तपासणीत डॉक्टरांनी त्यांना नजर कमी झाल्याचे प्रमाणपत्र दिले. त्यानंतर जिल्हा परिवहन महामंडळाकडून त्यांना पर्यायी नौकरी न देता सरळ सेवेतूनच बडतर्फ करण्यात आले आहे. या विरोधात सिद्धार्थ गवळी यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

माहिती देताना चालक सिद्धार्थ गवई व त्यांचा मुलगा

गवई यांचा चालक परवाना देखील आरटीओ मार्फत रद्द करण्यात आला आहे. गेल्या २३ महिण्यांपासून त्यांना पगारसुद्धा देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांना परिवार चालवणे कठीण होवून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कामावर रुजू करा, २३ माहिण्याचा पगार द्या या मागणीसाठी गवई यांनी आपल्या कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

गवई हे जामोद राज्य परिवहन एस.टी आगारात गेल्या दोन वर्षांपूर्वी पर्यंत चालक पदावर कार्यरत होते. त्यांनी ८ वर्ष ही नोकरी यशस्वीरीत्या पार पाडली. मात्र दोन वर्षांपूर्वी एस.टी महामंडळाने दरवर्षीप्रमाणे वैद्यकीय तपासणी केली. दरम्यान गवळी यांच्या डोळ्यांची तपासणी केली असता, त्यांच्या एका डोळ्यातील दृष्टी कमी झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्याच दिवशी पासून गवळी यांची चालक पदाची जबाबदारी आगाराने काढून घेतली.

त्यानंतर एसटी महामंडळाने गवळी यांना नियमानुसार आगारातील इतर पदांवर नियुक्त करणे अपेक्षित होते. मात्र त्यांना इतर कुठलीही जबाबदारी देण्यात आली नाही. शिवाय मागील दोन वर्षापासून पगारही देण्यात आला नाही. त्यावर भरीस भर म्हणून एसटी महामंडळाने आरटीओ विभागाकडे पत्र देऊन गवळी यांचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द करून घेतला. त्यामुळे गवळी यांच्यावर आता उपासमारीची पाळी आली आहे. याबाबत अनेक वेळा महामंडळाकडे तक्रारी व अर्ज निवेदने देऊनही कुठलाही परिणाम झाला नाही. त्यामुळे एसटी महामंडळाच्या बुलडाणा येथील विभागीय कार्यालयाच्या विरोधात सिद्धार्थ गवळी यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरू केला आहे.

Intro:Body:बुलडाणा :डॉक्टरांच्या तपासणीत डोळ्यातील नजर कमी झाली म्हणून वाहकाच्याच परिवारात अंधार केल्याचा धक्कादायक प्रकार राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून समोर आलेय आहे.जळगाव जामोद आगारातील वाहक सिद्धार्थ गवई यांच्या दरवर्षीच्या आरोग्य तपासणीत डॉक्टरांनी सिद्धार्थ गवई यांची नजर कमी झाली आल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.याच प्रमाणपत्रावर बुलडाणा विभागामार्फत गवईंना पर्याय नोकरी न देता थेट सेवेतूनच बडतर्फ करण्यात आले.एवढेच नव्हे तर त्यांचा चालकचा परवानाही आरटीओ मार्फत रद्द करण्यात आला आहेत .गेल्या 23 महिण्यापासून चालक गवई यांना पगार देण्यात आली नाही.परिवार चालवणं कठीण होवून उपासमारीची वेळ आलीय कामावर रुजू करा, 23 माहिण्याचा पगार द्या या मागणीसाठी गवई यांनी आपल्या कुटूंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

हे आहेत जळगाव जामोद राज्य परिवहन एस टी आगारातील चालक सिद्धार्थ गवई दोन वर्षांपूर्वी पर्यंत हे जळगाव जामोद आगारात चालक पदावर कार्यरत होते. ८ वर्ष त्यांनी नोकरी हि यशस्वीरीत्या त्यांनी पार पाडली. मात्र दोन वर्षांपूर्वी एस टी महामंडळाने दरवर्षीप्रमाणे वैद्यकीय तपासणी केली या तपासणीत डोळ्यांची तपासणी केली या तपासणीमध्ये गवळी यांना एका डोळ्यातील दृष्टी कमी झाल्याचे समोर आले त्यामुळे त्याच दिवशी पासून गवळी यांना चालक पदाची जबाबदारी आगारातून देण्यात आली नाही. एसटी महामंडळाने यानंतर गवळी यांना नियमानुसार आगारातील इतर पदांवर नियुक्त करणे आवश्यक असताना त्यांना कुठेही जबाबदारी देण्यात आली नाही शिवाय मागील दोन वर्षापासून पगारही दिला नाही त्यावर भरीस भर म्हणून एसटी महामंडळाने आरटीओ विभागाकडे पत्र देऊन गवळी यांचा लायसन्स म्हणजेच वाहन चालवण्याचा परवाना रद्द करून घेतला आहे. त्यामुळे गवळी यांच्यावर आता उपासमारीची पाळी आली आहे याबाबत अनेक वेळा महामंडळाकडे तक्रारी व अर्ज निवेदने देऊनही ही कुठलाही परिणाम झाला नसल्याने शेवटी एसटी महामंडळाच्या बुलडाणा येथील विभागीय कार्यालयाच्या विरोधात सिद्धार्थ गवळी यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे.

बाईट - 1) सिद्धार्थ गवई (चालक)

2) रामदास गवई, चालकाचा मुलगा..

-वसीम शेख,बुलडाणा-
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.