ETV Bharat / state

पुढच्या टप्प्यात केंद्र सरकारने रेमडेसिवीरचा बॅकलॉक पूर्ण करून घ्यावा - डॉ. राजेंद्र शिंगणे - डॉ.राजेंद्र शिंगणेंबद्दल बातमी

पुढच्या टप्प्यात केंद्र सरकारने रेमडेसिवीरचा बॅकलॉक पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केली आहे. ते बुलडाण्यात ध्वजारोहणानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Dr. Rajendra Shingane has demanded central government should complete backlog of Remdesivir in next phase
पुढच्या टप्प्यात केंद्र सरकारने रेमडेसिवीरचा बॅकलॉक पूर्ण करून घ्यावे- डॉ.राजेंद्र शिंगणे
author img

By

Published : May 1, 2021, 5:46 PM IST

बुलडाणा - वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या किमान 10 टक्के राज्याला रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज असतांना राज्याला 4 लाख 35 हजार रेमडेसिवीर येणे अपेक्षीत होते. मात्र, त्यामध्ये 1 लाख 70 हजार रेमडेसिवीर कमी आले आहेत. यामुळे पुढच्या टप्प्यात केंद्र सरकाने 1 लाख 70 हजाराचा रेमडेसिवीरचा बॅकलॉक भरून काढून रेमडेसिवीरचा पुरवठा द्यावा, अशी विनंती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शनिवारी 1 में महाराष्ट्रदिनी केली. ते बुलडाण्यात ध्वजारोहणनंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते. त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया तसेच कार्यालयातील मोजकेच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

पुढच्या टप्प्यात केंद्र सरकारने रेमडेसिवीरचा बॅकलॉक पूर्ण करून घ्यावे- डॉ.राजेंद्र शिंगणे

केंद्राने 21 एप्रिलपासून रेमडेसिवीरचा पुरवठा घेतला हातात -

राज्यात सध्या 7 लाखच्या वर कोरोनाचे अ‌ॅक्टिव्ह रुग्ण असून याच्या तुलनेत 10 टक्के रेमडेसिवीरचा पुरवठा करण्याचे प्रयत्न चालेला आहेत. मागच्या 21 एप्रिलपासून केंद्र सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा आपल्या हातात घेतला आहे. केंद्र शासनाने ज्या रेमडेसिवीर बनवणाऱ्या कंपन्या आहेत, त्या सर्वांना प्रत्येक राज्यामध्ये कोणत्या दिवशी किती रेमडेसिवीर द्यायचे याचे नियोजन त्यांनी दिले आहे. माझ्या माहितीप्रमाणे 21 एप्रिल पासून ते 30 एप्रिलपर्यंत या दहा दिवसाचा प्रोग्राम केंद्र सरकारने दिला होता. त्यानुसार आपल्याला 4 लाख 35 हजार रेमडेसिवीर येणे अपेक्षित होते. मात्र, त्यामध्ये 1 लाख 70 हजार रेमडेसिवीर कमी आले आहेत. माझी केंद्र सरकारला विनंती आहे, येथून पुढचा कार्यक्रम सरकार देईल. आज महाराष्ट्रामध्ये 70 हजार रेमडेसिवीर दररोज लागतात, अशी परिस्थिती आहे. थोडफार कमी-जास्त झाले तरी चालेल. पात्र, जास्तीत-जास्त रेमडेसिवीरचा पुरवठा येथून पुढंच्या काळामध्ये करावा. मागचा राहिलेला 1 लाख 70 हजारचा पुरवठा सुद्धा पूर्ण करून पुढच्या काळामध्ये आम्हाला जास्तीत-जास्त रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा कंपन्यांच्या माध्यमातून करावा. एक विनंती केंद्र सरकारला माझी राहणार आहे, की ज्या कंपन्यांमध्ये रेमडेसिवीर तयार करण्यात येते त्या कंपन्यांना निर्देश देवून ज्या-ज्या राज्यांना, ज्या-ज्या दिवशी जेवढा-जेवढा कोटा आपण निर्धारित केलेला आहे. त्याचे पालन करावे, अशी अपेक्षा डॉ. शिगणेंनी यांनी व्यक्त केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.