बुलडाणा - संपूर्ण देशभर डॉक्टरांवर होत असलेल्या विविध प्रकारच्या हल्ल्यां विरोधात आणि ॲलोपॅथी उपचार तर व्हॅक्सिनेशन विरोधातील वक्तव्यांच्या विरोधात निषेधार्थ शुक्रवारी 18 जून रोजी संपूर्ण देशभर आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेने काळ्या फीती, काळे मास्क अथवा काळया फिती लावून आपला निषेध व्यक्त करत आंदोलन केली. या आंदोलनात हल्ले करणाऱ्यांवर ताडा कायदा लावण्यात यावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यातील डॉक्टरांनी सहभाग नोंदविला व यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्या निषेधार्थ बुलडाण्यात डॉक्टरांचे आंदोलन - IMA Doctors Association Movement
कोरोना काळात संपूर्ण देशात डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करत आहेत, ज्यामध्ये अनेक डॉक्टरांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यांना शासनाकडून पाहिजे ती मदत देखील करण्यात आली नाही. आणि दुसरीकडे अनेक डॉक्टरांवर वेगवेगळे आरोप करून त्यांच्यावर हल्ले करण्यात येत आहेत.