बुलडाणा - भंडारा येथे सीनियर पुरुष व महिला तसेच ज्युनिअर व सबज्युनिअर मुले व मुली यांच्या विदर्भ राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने बुलडाणा जिल्हयाच्या संघ निवडीसाठी दि.1 डिसेंबर 2019 रोजी खामगांव येथील श्री शिवाजी व्यायाम मंदिराच्या मैदानावर जिल्हा निवड चाचणी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतून महाराष्ट्र राज्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी बुलडाण्याच्याचा संघ निवडण्यात येणार आहे.
हेही वाचा - नवऱ्याने झळकावलं त्रिशतक अन् बायकोला आठवले 'महात्मा गांधी'...
खामगांव येथील श्री शिवाजी व्यायाम मंदिराच्या मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेचे उदघाटक म्हणून महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष तथा सुप्रसिध्द उद्योगपती गोकुलसिंहजी सानंदा, माउली ग्रुपचे अध्यक्ष तथा काँग्रेस नेते ज्ञानेश्वरदादा पाटील, श्री शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त विरप्रतापजी थानवी, माजी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, विदर्भ एम्युचर कबड्डी असोसिएशन अमरावतीचे अध्यक्ष अशोकबाप्पू देशमुख, माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, दिग्वीजयसिंह सानंदा, राजेश जोशी सर, मोहन परदेसी,तुषार चंदेल आदींची यावेळी उपस्थिती होती.
सर्वप्रथम श्री शिवाजी व्यायाम मंदिर येथे बजरंग बलीची मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. यांनतर आयोजकांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देउन सत्कार करण्यात आला. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते विधीवत नारळ फोडून या निवड चाचणी स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी कबड्डी खेळाडुंनी मान्यवरांना आपला परिचय करुन दिला. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना सांगितले कि, कबड्डी हा सांघिक खेळ असुन या खेळात नावलौकीक मिळवायचा असेल तर सुदृढ शरीर तयार करुन सरावात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. जिदद् आणि चिकाटीने जर खेळाडुंनी खेळ केला तर ते जीवनात निश्चित रुपाने यशस्वी होतात युवकांनी कबड्डीमध्ये सातत्याने चांगला सराव करुन खिलाडूवृत्ती अंगी बाळगून विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे. चांगल्या खेळाचे कौशल्य दाखवून आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन रणजीतसिंह बयस यांनी तर आभार प्रदर्शन तुषार चंदेल यांनी केले.स्पर्धेचे पंच म्हणून रणजित बयस तर, विशाल बोरसल्ले, संजय चव्हाण, सुधाकर खासने, गजानन राउत, अशोक ढिसले,विपीन हटकर,दिनेश चंदेल,लखन निंबाळकर,सुरेंद्रसिंग मेहरा आदींनी काम पाहिले.
निवडचाचणी स्पर्धेमध्ये सब ज्युनिअर मुले गटात 128, सब ज्युनिअर मुलींमध्ये 145, ज्युनिअर मुले 145, सिनीअर मुले 65, सब ज्युनिअर व ज्युनिअर महिला गटामध्ये 275 अश्या एकुण 413 खेळाडुंनी सहभागी घेतला. यावेळी श्री शिवाजी व्यायाम मंदिराचे जगदिश सोनी, महावीर थानवी, श्यामभाउ जैस्वाल, तुषार गायकवाड, शुभम धोपटे, शुभम पाटील, जितेश पाटील, मयुर क्षिरसागर, भुषण पाटील, सचिन बोदडे, ऋषीकेश भावसार, गौरव गावंडे, प्रसाद नटकुट, अमोल राजपुत, प्रतिक सोनी, शिवा शर्मा, सत्तु शर्मा, राहुल जांगीड, भारत महाल्ले, मनोज वानखडे, निखील जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता श्री शिवाजी व्यायाम मंदिराच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी परिश्रम घेतले.