बुलडाणा : मेहकर तालुक्यातील नागझरी येथील कॅनॉलमध्ये एक स्त्री जातीचे नवजात मृत अर्भक सापडल्याची घटना शुक्रवारी 12 मार्च रोजी समोर आली. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर मृत अर्भक कॅनॉलमधून बाहेर काढून तपासाला सुरूवात केली आहे.
पोलीस तपास सुरू
मेहकर तालुक्यातील नागझरी येथील शेतशिवारात असलेल्या कॅनॉलमध्ये एक स्त्री जातीचे अर्भक पडल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती येथील पोलीस पाटील यांनी मेहकर पोलीस ठाण्यात दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा करून मृत अर्भक बाहेर काढले. सदर मृत अर्भक अनैतिक संबंधांतून जन्मले किंवा मुलगी झाल्याने तिला कॅनॉलमध्ये फेकून दिले गेले याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.
मेहकरच्या नागझरी शिवारात कॅनॉलमध्ये स्त्री जातीचे मृत अर्भक सापडल्याने खळबळ - buldana mehkar infant news
मेहकर तालुक्यातील नागझरी येथील कॅनॉलमध्ये एक स्त्री जातीचे नवजात मृत अर्भक सापडल्याची घटना शुक्रवारी 12 मार्च रोजी समोर आली. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.