ETV Bharat / state

कोरोनाबाधित रुग्णाच्या अर्धवट जळलेल्या मृतदेहावर पुन्हा अंत्यस्कार

बुलडाण्यामध्ये एका कोरोनाबाधित मृतावर अत्यंसंस्कार करण्यात आले. मात्र, त्याचा मृतदेह अर्धवटच जळाला. त्यामुळे मृतदेहावर पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात आले.

covid 19 patient funeral
कोरोनाबाधित रुग्णाच्या अर्धवट जळलेल्या मृतदेहावर पुन्हा अंत्यस्कार
author img

By

Published : Jun 24, 2020, 3:58 PM IST

बुलडाणा - कोरोनाच्या भितीमुळे अनेक मृतदेह रुग्णालयात पडून असल्याच्या राज्यातील अनेक घटना समोर आल्या होत्या. कोरोनाच्या धास्तीने लोक कोरोनाबाधित मृतदेहाजवळ सुद्धा जाण्यासाठी धजावत नाहीत. अशातच बुलडाण्यामध्ये एका कोरोनाबाधित मृतावर अत्यंसंस्कार करण्यात आले. मात्र, त्याचा मृतदेह अर्धवटच जळाला. त्यामुळे मृतदेहावर मुस्लिम युवक आणि माजी आमदार यांनी पुन्हा अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कार केल्यानंतर माजी आमदार आणि समाजसेवकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.

सोमवारी मलकापूर येथील 70 वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोनामूळे मृत्यू झाला होता. प्रोटोकॉलनुसार आरोग्य विभागाने संबंधीत महिलेचा मृतदेह परिवाराच्या ताब्यात दिला. यावर मृत वृद्ध महिलेचा अंत्यविधी स्थानिक जोहर नगर येथील स्मशानभूमीत रात्री 8 वाजता भाजप नगरसेवक अरविंद होंडे यांच्यासह परिवारातील व अन्य असे चार जणांच्या उपस्थितीत पार पडला. मात्र, मृतदेह अर्धवच जळाला.

मंगळवारी (23 जून) रोजी सकाळी 10 वाजता प्रभागातील नगरसेविकेटे पती तथा समाजसेवक मोहम्मद अजहर हे स्मशानभूमीत गेले असता त्यांना अंतिम संस्कार करण्यात आलेल्या मृत महिलेचा मृतदेह अर्धवट जळल्याचे निर्दशनास आले. या घटनेच गांभीर्य लक्षात घेता त्यांनी तत्काळ तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन आणि नगर परिषद प्रशासनासर काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना माहिती दिली. यावेळी माजी आमदार घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. मात्र, प्रशासनाला येण्यास उशीर होत असल्याचे पाहून समाजसेवक मोहम्मद अजहर यांनी आपल्या स्वखर्चाने लाकडाची आणि डिझेलची व्यवस्था केली. वेळ वाया न घालवता अधर्वट जळालेल्या मृतदेहावर लाकडी रचून दोघांनी अग्नी देत अंतिम संस्कार पार पाडले. यावेळी शेख जावेद, भाजपचे नगरसेवक अरविंद होंडे आणि त्यांचे सहकारी हे हजर झाले होते.

अंतिम संस्कार झाल्यानंतर माजी आमदार सपकाळ आणि मोहम्मद अजहर यांनी जिल्हा प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत यानंतर कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहाचे अंतिम संस्कार प्रोटोकॉलनुसार अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या उपस्थित करावे, अशी मागणी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.