ETV Bharat / state

कोरोनाच्या भीतीने होळी-रंगपंचमीला नैसर्गिक रंगांचा वापर, चिनी रंगांकडे पाठ

author img

By

Published : Mar 10, 2020, 4:16 PM IST

Updated : Mar 10, 2020, 4:46 PM IST

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रंगपंचमीसाठी चीनहून येणारे साहित्य नागरिकांकडून आणि बच्चे कंपनीकडून टाळले जात आहे. यंदा ग्रामीण भागात नागरिक आणि लहान मुलांकडूनही नैसर्गिक रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय.

चिनी रंगांकडे पाठ
चिनी रंगांकडे पाठ

बुलडाणा - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रंगपंचमीसाठी चीनहून येणारे साहित्य नागरिकांकडून आणि बच्चे कंपनीकडून टाळले जात आहे. भारतात विविध उत्सवांसाठी चीनहून मोठ्या प्रमाणात साहित्य आयात केले जाते. याला मागणीही मोठ्या प्रमाणात असते. मात्र, यंदा ग्रामीण भागात नागरिक आणि लहान मुलांकडूनही नैसर्गिक रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय.

कोरोनाच्या भीतीने होळी-रंगपंचमीला नैसर्गिक रंगांचा वापर, चिनी रंगांकडे पाठ

आपल्या देशात साजऱ्या होणाऱ्या महत्त्वाच्या उत्सवांपैकी होळी हा एक उत्सव आहे. हा सण अतिशय जल्लोषात साजरा होतो. याच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन करून अनेक ठिकाणी रंग खेळले जातात. यासाठी दरवर्षी पिचकारी, रंगांना मोठी मागणी असते. यातील बहुतेक वस्तू चीनहून आयात होतात. मात्र, या वर्षी कोरोनाच्या भीतीने चायनीज वस्तूंकडे लोकांनी पाठ फिरवली आहे.

चीनहून येणाऱ्या रासायनिक रंगांचा वापर टाळून घरच्या घरी बनवलेल्या नैसर्गिक रंगांचा वापर या होळी आणि रंगपंचमीला करण्यात येत आहे. यामुळे रासायनिक रंगांवर नैसर्गिक होळी भारी पडली आहे. कोरोनाच्या भीतीने का होईना पण, रासायनिक रंगांचा वापर टाळला जाणे ही बाब लोकांच्या आरोग्याच्या आणि निसर्गाच्या दृष्टीने सकारात्मक ठरली आहे.

हेही वाचा - कोरोना इफेक्ट : कोल्हापुरात चक्क कोंबड्यांचा सेल; 200 रुपयांना 'इतक्या' कोंबड्या

हेही वाचा - CORONA VIRUS : हिंगोलीत बॉयलर दहा रुपये किलो; तरीही ग्राहकांची पाठ

Last Updated : Mar 10, 2020, 4:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.