बुलडाणा- राज्यात तीन पक्षांची महाविकास आघाडीची सरकारची सत्ता आहे तरी देखील पुढच्या कार्यकाळात राज्यात आपल्याच पक्षाची एक हाती सत्ता मिळवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस पक्षाचा असल्याचा समोर आले आहे. येणाऱ्या काळात राज्यात आमच्या पक्षाची एक हाती सत्ता आणण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे वक्तव्य काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड यांनी केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शुक्रवारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव के.सी.वेणुगोपाल यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्षांची घोषणा केली आहे. त्यामध्ये बुलडाणा येथील काँग्रेस नेते संजय राठोड यांचाही समावेश आहे.
राज्यात एक हाती सत्ता मिळवण्याचा आमचा प्रयत्न- संजय राठोड - महाविकास आघाडी लेटेस्ट न्यूज
जिल्ह्यातील व राज्यातील जे नेते काँग्रेस सोडून गेलेले आहे ते संपर्कात आहे. त्यांना परत काँग्रेसमध्ये परत घेणार असल्याची माहिती राठोड यांनी दिली.