ETV Bharat / state

Amravati Graduate Constituency : मला मिळणारे समर्थन पाहून विरोधकांकडून खोटी ऑडिओ क्लिप व्हयरल - धिरज लिंगाडे

अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर होत असताना काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे आणि अपक्ष उमेदवार शरद झांबरे यांच्यात मोबाईल फोनवर झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिप मध्ये काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे हे काँग्रेस हा बोगस पक्ष आहे, अशी टीका करताना स्पष्ट ऐकू येत असल्यामुळे ही ऑडिओ क्लिप अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

author img

By

Published : Jan 29, 2023, 1:03 PM IST

Amravati Graduate Constituency
धिरज लिंगाडे
विरोधकांकडून खोटी ऑडिओ क्लिप व्हयरल

बुलढाणा : विधानपरिषदेच्या अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आपल्याला पदवीधर व पदवीधरांच्या विविध संघटनांचे मोठे समर्थन मिळत आहे. प्रचारासाठी होणाऱ्या सभांना पाचही जिल्ह्यात पदवीधरांनी मोठी उपस्थिती दर्शविली, आता या निवडणुकीचा निकाल ही औपचारिकता आहे. आपल्याला मिळणारे समर्थन पाहून विरोधक बैचेन आहेत, त्यांच्या झोपा उडाल्या आहेत. विरोधकांना पोटशूळ उठला असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने आता खोटे ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. "तो" आवाजच आपला नसल्याचे धिरज लिंगाडे यांनी स्पष्ट केले आहे.

ऑडियो क्लिप पूर्णपणे खोटी : काही वर्षाआधी विद्यमान आमदारांचा कार्यकर्ता असलेल्या एका अपक्ष उमेदवाराने व्हायरल केलेली ऑडियो क्लिप पूर्णपणे खोटी आहे. तो आपला आवाजच नाही, याबद्दल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याशी आपले बोलणे झाले असून ऑडिओ क्लिप खोटी असल्याचे त्यांनाही सांगितले आहे. पदवीधर मतदार सुजाण आहेत. पदवीधरांच्या प्रश्नांवर काँग्रेस आणि महाविकास आघाडी हेच एकमेव उत्तर असल्याचे पदवीधर मतदारांना ज्ञात आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही खोडसाळपणा केला तरी लवकर त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम पदवीधर मतदार करणार आहे, असेही धिरज लिंगाडे यांनी म्हटले आहे.

असा आहे ऑडिओ क्लिपमधील संवाद : धीरज लिंगाडे यांना काँग्रेसने उमेदवारी देण्यापूर्वी अपक्ष उमेदवार शरद झांबरे यांनी मोबाईल फोनवर संवाद साधला. यामध्ये धीरज शिंगाडे हे दिल्लीला असताना शरद झांबरे यांनी त्यांना कॉल केल्याचे स्पष्ट झाले. मिळेल का उमेदवारी असा प्रश्न शरद झांबरे हे धीरज शिंगाडे यांना विचारतात. यावर लिंगाडे हे कळेल कोणासाठी जागा सुटते असे उत्तर देतात. जागा तर काँग्रेससाठी सुटली अशी चर्चा असल्याचे शरद झांबरे म्हणतात. यावर धीरज लिंगाडे हे तसे काही नाही आम्हाला तर फॉर्म भरायला सांगितले असल्याचे म्हणतात. रणजीत पाटील तुमच्या बुलढाणा जिल्ह्यात आहेत असे शरद झांबरे बोलतात. त्यावर धीरज लिंगाडे हे त्यांना तर वेळ मिळाला आहे फिरायला. काही खरं नाही आणि आता वेळेवर फिरणे देखील शक्य नाही. तरी बघूया काय म्हणते पार्टी. असे धीरज लिंगाडे यांनी म्हटल्यावर तुम्हाला उमेदवारी मिळाली तरच लढणार अन्यथा नाही ना असा प्रश्न शरद झांबरे लिंगाडे यांना विचारतात. यावर हो तसंच आहे असे म्हणत धीरज लिंगाडे हे काँग्रेस बोगस आहे, उमेदवार काही फाईट देणार नाही. या संवादादरम्यान शरद झामरे यांनी सुधीर ढोणेसाठी रणजीत पाटील यांनी नानाभाऊ अर्थात नाना पटोले यांना देखील मॅनेज केले अशी चर्चा आहे असे म्हणतात.

काँग्रेस हा बोगस पक्ष : यावर धीरज लिंगाडे यांनी हो हे तसेच आहे अशी प्रतिक्रिया देतात. सुधीर ढोणे याला स्वतः रणजीत पाटील यांनीच अर्ज छापून दिलेत. त्याने कुठलाही अर्ज जमा केला नाही. असा खळबळ जनक आरोप देखील शरद झांबरे यांनी धीरज लिंगाडे यांच्याशी बोलताना केला. यावर या सगळ्या गोष्टींवर कुठलाच इलाज नाही असे धीरज लिंगाडे म्हणतात. मी तर निवडणूक लढणार आहे. मी अपक्ष उभा राहील तुम्हाला जर उमेदवारी मिळाली नाही तर मला कृपया मदत करावी अशी विनंती देखील शरद जांभळे धीरज लिंगाडे यांना करतात. असा संपूर्ण संवाद या व्हायरल ऑडिओ क्लिपद्वारे संपूर्ण अमरावती विभागात जबरदस्त चर्चेचा विषय ठरतो आहे.

हेही वाचा : Sakal Hindu Samaj Mumbai: सकल हिंदू समाजाच्या वतीने लव जिहाद विरोधात मुंबईत विराट मोर्चा; हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते समाविष्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.