बुलडाणा - केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी विधेयकाच्या विरोधात 2 ऑक्टोंबर गांधी जयंती दिनी बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येक तालुका स्तरावर काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत. राज्यभरातून एक कोटी स्वाक्षऱ्यांची मोहीम राबवून केंद्र सरकारला हे निवेदन पाठवण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी आज गुरुवारी 29 सप्टेंबरला पत्रकार परिषदेतून दिली.
शेतकरी विधेयकाच्या विरोधात गांधी जयंती दिनी काँग्रेस करणार निदर्शने - बुलडाणा काँग्रेस शेतकरी सह्या मोहीम बातमी
२ ऑक्टोबरला राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालय, विधानसभा मतदार संघात धरणे आंदोलन केले जाणार आहे. कृषी विधेयकाबरोबरच केंद्र सरकारने कामगार कायद्यातही अमुलाग्र बदल केले आहेत. या बदलामुळे कामगार देशोधडीला लागणार आहे. काँग्रेसच्या सरकारांनी केलेल्या कामगार कायद्यामुळे त्यांना अनेक हक्क प्राप्त झाले होते. कंत्राटी कामगार कायम होत होता, पण आता नव्या कायद्यामुळे कायम कामगारही कंत्राटी होणार असून कामगारांना मालकांचे गुलाम बनवणारा हा कायदा आहे. म्हणून शेतकरी व कामगार यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी २ ऑक्टोबरला ‘किसान मजदूर बचाव दिवस’ पाळला जाणार आहे.
शेतकरी विधेयकाच्या विरोधात गांधी जयंती दिनी काँग्रेस करणार निदर्शने