ETV Bharat / state

बुलडाण्यात ७ ऑगस्ट रोजी भाजपची 'महाजनादेश यात्रा'; मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी - Mozari

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र येथून १ ते ९ ऑगस्ट दरम्यान यात्रेचा पहिला टप्पा सुरू होणार असून या भागातील एकूण १४ जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान ५७ विधानसभा मतदारसंघातून १६३९ किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार आहे.

ना.चैनसुख संचेती, अध्यक्ष, विदर्भ विकास मंडळ
author img

By

Published : Aug 1, 2019, 1:28 PM IST

Updated : Aug 1, 2019, 2:08 PM IST

बुलडाणा- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या पाच वर्षांतील कामांचा हिशोब जनतेपुढे ठेवण्यासाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'महाजनादेश यात्रेला' राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून आज (गुरुवार) सुरुवात होणार आहे. ही यात्रा ७ ऑगस्ट रोजी बुलडाणा जिल्ह्यात दाखल होणार असून जिल्ह्यात यात्रेच्या स्वागताची आणि जनसभांची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

यात्रेबद्दल माहिती देताना चैनसुख संचेती, अध्यक्ष, विदर्भ विकास मंडळ

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र येथून १ ते ९ ऑगस्ट दरम्यान यात्रेचा पहिला टप्पा सुरू होणार असून या भागातील एकूण १४ जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान ५७ विधानसभा मतदारसंघातून १६३९ किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचा समारोप नंदुरबार येथे होणार आहे. दरम्यान, ७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांची यात्रा बुलडाणा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. अकोल्यामध्ये सर्वप्रथम संत नगरी शेगावात ही यात्रा दाखल होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेगाव आणि खामगावातील जाहीर सभांना मार्गदर्शन करणार आहे. या नंतर चैनसुख संचेती यांच्या मतदारसंघातील नांदुरा आणि विदर्भाचे प्रवेशद्वार मलकापुरात यात्रेचे जंगी स्वागत होणार आहे. यासाठी विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष चैनसुख संचेती यांनी बुधवारी ३१ जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून सुरू होणाऱ्या या यात्रेचा दुसरा टप्पा १७ ऑगस्ट रोजी सुरू होईल. दुसऱ्या टप्प्यात ही यात्रा १८ जिल्ह्यातल्या ९३ विधानसभा मतदारसंघांत २७४५ किलोमीटर एवढा प्रवास करणार आहे. यात्रेचा एकूण प्रवास ३२ जिल्ह्यांतून ४३८४ किलोमीटर एवढ्या अंतराचा असणार आहे. दोन्ही टप्पे मिळून १५० विधानसभा मतदारसंघांमधून ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान ८७ मोठ्या सभा, ५७ स्वागत सभा होणार आहेत. याशिवाय एकूण २३८ पेक्षा अधिक गावांमध्ये स्वागत स्वीकारून यात्रेचा समारोप ३१ ऑगस्ट रोजी नाशिक येथे होणार आहे.

Intro:Body:
बुलडाणा: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या पाच वर्षांतील कामांचा हिशोब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून आज १ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. ही यात्रा ७ ऑगस्ट रोजी बुलडाणा जिल्ह्यात दाखल होणार असून जिल्ह्यात यात्रेच्या स्वागताची आणि जनसभांची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र येथून एक ते नऊ ऑगस्ट दरम्यान यात्रेचा पहिला टप्पा होणार असून या भागातील एकूण १४ जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान ५७ विधानसभा मतदार संघांतून १,६३९ किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचा समारोप नंदुरबार येथे होणार आहे. दरम्यान ७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांची हि सभा बुलडाणा जिल्ह्यात दाखल होणार आहे. अकोल्यावरून सर्वप्रथम संत नगरी शेगावात ही यात्रा दाखल होणार असून मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हे शेगाव आणि खामगावातील जाहीर सभांना मार्गदर्शन करणार आहे. या नंतर ना. चैसुख संचेती यांच्या मतदार संघातील नांदुरा आणि विदर्भाचे प्रवेशद्वार मालकापुरात यात्रेचे जंगी स्वागत होणार आहे. यासाठी विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष ना.चैनसुख संचेती यांनी बुधवारी ३१ जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

बाईट - ना.चैनसुख संचेती (अध्यक्ष- विदर्भ विकास मंडळ)

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून सुरू होणाऱ्या यायात्रेचा दुसरा टप्पा १७ ऑगस्ट रोजी सुरू होईल. दुसऱ्या टप्प्यात ही यात्रा १८ जिल्ह्यांतल्या ९३ विधानसभा मतदारसंघांत २,७४५ किलोमीटर एवढा प्रवास करणार आहे. यात्रेचा एकूण प्रवास ३२ जिल्ह्यांतून ४,३८४ किलोमीटर एवढ्या अंतराचा असणार आहे. दोन्ही टप्पे मिळून १५० विधानसभा मतदारसंघांमधून ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान ८७ मोठ्या सभा, ५७ स्वागत सभा होणार आहेत. याशिवाय एकूण २३८ पेक्षा अधिक गावांमध्ये स्वागत स्वीकारून यात्रेचा समारोप ३१ ऑगस्ट रोजी नाशिक येथे होणार आहे.

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
Last Updated : Aug 1, 2019, 2:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.