ETV Bharat / state

'थेट मुख्यमंत्री कार्यालयातून आता लोणार विकासाचा कार्यक्रम'

लोणार सरोवराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व कामे आता मुख्यमंत्री कार्यालयातून केले जातील. वेळोवेळी या विकासाच्या कामांचा आढावा मी स्वतः घेईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

uddhav
uddhav
author img

By

Published : Feb 5, 2021, 5:56 PM IST

Updated : Feb 17, 2021, 3:17 PM IST

बुलडाणा - लोणार सरोवराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही देत यापुढे लोणार विकासाचा कार्यक्रम थेट मुख्यमंत्री कार्यालयातून होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलडाण्याच्या लोणार येथे केली. ते लोणार सरोवराची पाहणी करण्यासाठी लोणार येथे आले होते.

थेट मुख्यमंत्री कार्यालयातून आता लोणार विकासाचा कार्यक्रम

वनकुटी व्ह्यू पॉइंटवरून पाहणी

जगविख्यात लोणार सरोवराला आंतरराष्ट्रीय रामसर पाणथळ क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज (शुक्रवारी 5 जानेवारी) लोणार सरोवराला भेट दिली. यावेळी अधिकार्‍यांची विशेष बैठक घेऊन लोणार विकास आराखड्यासंदर्भात अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर, आमदार संजय गायकवाड, जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषा पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

'विकासकामांचा वेळोवेळी स्वतः आढावा घेऊ'

ते पुढे म्हणाले, की लोणार सरोवर हे आपल्या सर्वांचे वैभव आहे. याचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. लोणार सरोवराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व कामे आता मुख्यमंत्री कार्यालयातून केले जातील. वेळोवेळी या विकासाच्या कामांचा आढावा मी स्वतः घेईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. सोबतच मातृतीर्थ सिंदखेडराजाच्या विकास आराखड्याची कामे अशाच पद्धतीने संपूर्ण विकास केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

'प्रस्तावावर काम करावे'

लोणार सरोवरात जैवविविधता विकसित झालेली आहे. त्यामुळे याठिकाणी विकास करताना नेमका विकास कोणत्या पद्धतीने करावा, याचा विचार एकत्रितरित्या करावा. याठिकाणी मंदिरांची संख्या अधिक आहे, त्यामुळे याठिकाणी वन पर्यटन किंवा मंदिराच्या भेटी अशा पर्यायांपैकी एका पर्यायाची निवड करून त्याच प्रस्तावावर काम करावे. या ठिकाणची वनसंपदा धोक्यात येऊ नये, असे ते म्हणाले. येथे वैज्ञानिकही मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे त्यांचाही विचार होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

Last Updated : Feb 17, 2021, 3:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.