ETV Bharat / state

लहान मुलाचे लैंगिक छळ प्रकरण; आरोपीस 5 वर्षाची शिक्षा - शासकीय मुलांचे निरीक्षण गृह लैंगिक अत्याचार प्रकरण

27 ऑगस्ट 2017 रोजी शासकीय मुलांचे निरीक्षण गृहातील प्रवेशित 16 वर्षीय मुलावर रात्री झोपेत असताना सदर गुन्हेगाराने त्याचा लैंगिक छळ केला होता. तसेच दुसर्‍याही प्रवेशित मुलासह 28 जुलै ते 1 ऑगस्ट 2017 दरम्यान निरीक्षण गृहात वास्तव्यास असताना त्याच्यासोबत देखील अनैसर्गिक अत्याचार केला होता. याबाबत निरीक्षण गृह अधिक्षक भाऊराव राठोड यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

Child sexual abuse case in buldana; accused got 5 years jail
लहान मुलाचे लैंगिक छळ प्रकरण; आरोपीस 5 वर्षाची शिक्षा
author img

By

Published : Dec 12, 2019, 1:08 PM IST

बुलडाणा - येथील शासकीय मुलांचे निरीक्षण गृहातील मुलावर लैंगिक अत्याचार करणार्‍या काळजीवाहकाला 5 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. बुधवारी जिल्हा न्यायालयाने हा आदेश दिला. निवृत्ती बारीकराव राजपूत असे गुन्हेगाराचे नाव आहे. तसेच त्याला 60 हजार रुपयांच्या दंडदेखील ठोठावण्यात आला आहे.

लहान मुलाच्या लैंगिक छळ प्रकरण

27 ऑगस्ट 2017 रोजी शासकीय मुलांचे निरीक्षण गृहातील प्रवेशित 16 वर्षीय मुलावर रात्री झोपेत असताना सदर गुन्हेगाराने त्याचा लैंगिक छळ केला होता. तसेच दुसर्‍याही प्रवेशित मुलासह 28 जुलै ते 1 ऑगस्ट 2017 दरम्यान निरीक्षण गृहात वास्तव्यास असताना त्याच्यासोबत देखील अनैसर्गिक अत्याचार केला होता. याबाबत निरीक्षण गृह अधिक्षक भाऊराव राठोड यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सायलेंट रिसॉर्टजवळ हेल्मेटधारक दुचाकीस्वाराचा जीवघेणा गोळीबार

या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकुण 16 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल वसंत भटकर यांनी प्रभावी युक्तीवाद केला आणि आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली होती. साक्षी पुरावे ग्राह्य धरून निवृत्ती राजपूत याला 5 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच 60 हजार रुपयांचा दंडदेखील ठोठावण्यात आला आहे. तर दंड न भरल्यास अनुक्रमे 3 महिने आणि 1 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच दंडाच्या रकमेपैकी 25 हजार रुपये पिडीत मुलाला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश देखील पारित केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मनोज सुरवाडे, उपनिरीक्षक व्यंकटराव कवास यांनी केला. तर कोर्ट पैरवी म्हणून किशोर तांगडे यांचे सहकार्य लाभले.

Intro:Body:बुलडाणा:-बुलडाणा येथील शासकीय मुलांचे निरीक्षण गृहातील मुलावर लैंगिक अत्याचार करणार्‍या काळजीवाहक निवृत्ती बारीकराव राजपूत याला 5 वर्षाचा सश्रम कारावास व 60 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा न्यायालयाने सुनावली आहे. हा निकाल बुधवारी 11 डिसेंबरला जिल्हा न्यायालयाने दिला.

27 ऑगस्ट 2017 रोजी शासकीय मुलांचे निरीक्षण गृहातील प्रवेशीत 16 वर्षीय मुलावर रात्री झोपेत असतांना सदर गुन्हेगाराने त्याचा लैंगिक छळ केला होता. तसेच दुरसर्‍याही प्रवेशित मुलासह 28 जुलै ते 1 ऑगस्ट 2017 दरम्यान निरीक्षण गृहात वास्तव्यास असतांना त्याच्यासोबत देखील अनैसर्गिक संभोग केल्याचे तक्रार निरीक्षण गृह अधिक्षक भाऊराव राठोड यांनी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकुण 16 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकारी पक्षातर्फेे जिल्हा सरकारी वकिल वसंत भटकर यांनी प्रभावी युक्तीवाद केला व आरोपीला कठोर शिक्षेची मागणी करण्यात आली. साक्षी पुरावे ग्राह्य धरून विद्यमान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन यांनी निवृत्ती राजपूत याला बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8 व 10 अंतर्गत 5 वर्ष तसेच बालन्याय कायद्याचे कलम 75 अंतर्गत  5 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व दोन्ही कलमांन्वये ठोठावण्यात आलेली कारावासाची शिक्षा एकत्रितपणे भोगण्याची तरतूद व अनुक्रमे 10 हजार व 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास अनुक्रमे 3 महिने व 1 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच दंडाच्या रकमेपैकी 25 हजार रुपये पिडीत मुलाला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश देखील पारित केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक मनोज सुरवाडे, उपनिरीक्षक व्यंकटराव कवास यांनी केला. कोर्ट पैरवी म्हणून किशोर तांगडे यांचे सहकार्य लाभले. 

बाईट:- 1) वसंत भटकर, जिल्हा सरकारी अभिवक्ता
2) अॅड. किरण राठोड ,जिल्हा सदस्य बालकल्याण समिती..

-वसीम शेख ,बुलडाणा-Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.