ETV Bharat / state

दोघा नराधमांना फाशी द्या, 'त्या' घटनेच्या निषेधार्थ चिखलीकरांकडून भव्य रॅली काढून निषेध

नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, खटला जलदगतीने चालवण्यात यावा आणि पीडितेच्या कुटुंबाला शासनाने मदत करावी, या मागण्यांसाठी आणि घटनेच्या निषेधार्थ चिखली बंदची हाक देण्यात आली होती.

चिखलीकर ग्रामस्थ निवेदन देताना
author img

By

Published : Apr 30, 2019, 9:02 AM IST

बुलडाणा - चिखली येथे २७ एप्रिलला रात्री १ वाजण्याच्या दरम्यान २ नराधमांनी ९ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले होते. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. या घटनेच्या निषेधार्ध चिखलीच्या ग्रामस्थांनी हजारोंच्या संख्येने रॅली काढली आणि दोघा नराधमांना त्वरीत निकाल देत फाशी देण्याची मागणी केली. यावेळी चिखलीकर ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला होता.

चिखलीकर ग्रामस्थांची रॅली आणि प्रतिक्रिया

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. तर, एकाला चिखली न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांनी दिली आहे. नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, खटला जलदगतीने चालवण्यात यावा आणि पीडितेच्या कुटुंबाला शासनाने मदत करावी, या मागण्यांसाठी आणि घटनेच्या निषधार्थ चिखली बंदची हाक देण्यात आली होती. ग्रामस्थांनी मागण्याचे निवेदन प्रशासनाला दिले.

Intro:Body:बुलडाणा:; माणुसकीला काळीमा फासणारी घटना चिखली येथे दिनांक 27 एप्रिल च्या रात्री एक वाजता घडली एका ९ वर्षीय चिमुकलीवर दोन नराधमांनी लैंगिक अत्याचार केले प्रकरणी पोलिसांनी दोन्ही नराधामास अटक केली.मात्र या घटनेचा जनतेमध्ये खूप आक्रोश असून या घटनेच्या निषेधार्थ चिखलीकर यांच्या वतीने हजारोच्या संख्येत निषेध रैली काढण्यात आली व या दोन्ही नराधमांना त्वरित निकाल लावून फाशीची शिक्षा देण्यात यावी, पीडितांच्या गरीब कुटुंबा ला शासनाने तातडीने मदत द्यावी अश्या मागणी करण्यात आली.यावेळी चिखलीकरांनी कडकडीत बंद पाळला या बंदमध्ये चिखली शहरातील प्रतिष्ठाने उत्स्फूर्तपणे बंद पाळली.

माणुसकीला काळीमा फासणारी घटना चिखलीत उघडकीस आली असुन याप्रकरणी दोषी असलेल्या त्या नराधमांची सखोल चौकशी करून या दोन नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, खटला जलद गतीने चालण्यात यावे व पीडिताच्या कुटूंबाला शासनाने मदत करावी या मागणी घेवून घटनेचा निषधार्थ चिखली बंदची हाक देण्यात आली होती.यावेळी चिखलीकरांनी स्वयं फुरतीने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून बंद पाळला तर हजारोच्या संख्येने महिला व नागरिकांनी चिखली शहरात निषेध रैली काढली व आपल्या मागण्याचे निवेदन प्रशासनाला दिले.दोन्ही आरोपींना चिखली पोलिसांनी अटक केली आहे. एकास पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे तर आज एकास चिखली न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांनी दिली.

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.