बुलडाणा - कोरोनाच्या काळामध्ये लसीचा पुरवठा अथवा रेमडीसीवरचा पुरवठा असेल. ऑक्सिजनचा पुरवठा असेल. इतर राज्यांना आणि महाराष्ट्राला केलेल्या तिन्ही बाबीचा पुरवठा करणे गरजेचे आहे. हा काही राजकारणाचा विषय नाही आहे. शेवटी हा सर्वसामान्यांचा प्रश्न असल्यामुळे केंद्र सरकारने राज्यात भेदभाव न करता समान वागणूक द्यावी. अजूनही लसीचा पाहिजे तसा पुरवठा होत नाही. मात्र, येणाऱ्या काळात लस सर्वाना मिळाली तर नक्की याचा फायदा कोरोना रोखण्यासाठी होणार आहे. लस पुरवठा बाबतीत राज्याला दुजाभाव केला जातोय. केंद्र सरकारने लस पुरवठा पूर्ण क्षमतेने केला पाहिजे. तरच लसीकरण मोहीम पूर्ण होईल.असे वक्तव्य राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज शुक्रवारी शेंगाव येथे केले. महिला राष्ट्रवादी कडून आयोजित कोरोना योद्धयांचे सत्कार कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते.
कोरोना काळात प्रत्येकाच्या घरापर्यंत कार्य करणाऱ्या आशा सेविकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राज्य सचिव नंदाताई पाऊलझगडे यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. शेगाव तालुक्यातील आशा सेविकांचा प्रमाणपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, पारनेरचे आमदार निलेश लंके, जिल्हाध्यक्ष एड नाझेर काझी, यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. राजेंद्र शिंगणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर मतदार संघाचे सुपरिचित आमदार निलेश लंके यांचा देखील सत्कार करण्यात आला.
200 आशा सेविकांचा सत्कार
कोरोनाच्या या जागतिक संकटाने अनेक रक्ताची नाती आणि जीवाभावाचे लोकं आपण गमावून बसलो आहे. कोरोनाच्या भयानक काळामध्ये कुटुंबीयही कोरोना रुग्णांच्या जवळ जाण्यासाठी घाबरत होते. अशावेळेस डॉक्टर , नर्स , परिचर, सफाई कामगार, यांनी आपला जीव धोक्यात घालून लाखो रुग्णांना जीवदान दिले. त्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये गावातील प्रत्येक घरी जाऊन कोरोना जनजागृती आणि तपासणी करण्यामध्ये सिंहाचा वाटा होता तो म्हणजे आशा सेविकांचा. मात्र या आशा वर्कर दुर्लक्षित होत्या. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राज्य सचिव नंदाताई पाऊलझगडे यांच्या आयोजित कार्यक्रमातून शेगाव तालुक्यातील 200 आशा सेविकांचा सत्कार करण्यात आला.
3 कोटी लसीचे डोशींची गरज
राज्याचे आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी सातत्याने चालविली आहे. कोरोनाला हरवायचे असल्यास, शंभर टक्के लसीकरण हाच त्याच्यावर अंतिम उपाय आहे. माझ्या माहिती प्रमाणे लसीचा पुरेपूर पुरवठा होत नाहीये.आजही लसीकरण बऱ्याच वेळा चालू राहते. आणि अचानक लसी नसल्यामुळे बंद राहते. त्यामुळे नियमितपणे लसीकरण सुरू राहिले पाहिजे.
तिसरी लाटेसाठी प्रशासन सज्ज
संत गजानन महाराज यांच्या कृपेने तिसरी लाट येऊ नये. काळात कोरोनासाठी लागणारेसर्व औषधी, ऑक्सीजन, रेमडीसीवीर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मुलांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसत आहे. त्यांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बालरोग तज्ञ उपलब्ध आहेत. तसेच बालकासाठी विशेष कक्ष उभारले गेले आहेत.अशी माहिती राज्याचे अन्न व औषध मंत्री डॉ राजेन्द्र शिंगणे यांनी दिली आहे.