ETV Bharat / state

लॉकडाऊन महाराष्ट्र : यावर्षाची ईद साधेपणाने साजरी करा; बुलडाण्यातील युवकांचे आवाहन - buldana ramdan eid 2020

दिवसेंदिवस महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत जात आहे. अशा परिस्थितीत बुलडाण्यात रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी मुस्लीम समाजातील लोकांनी यावर्षाची ईद साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Muslims appeal other Muslims
मुस्लीम तरुण आवाहन करताना.
author img

By

Published : May 23, 2020, 3:00 PM IST

Updated : May 26, 2020, 4:53 PM IST

बुलडाणा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी अत्यंत साध्या स्वरूपात रमजान ईद साजरी करावी, असे आवाहन येथील युवक करत आहेत.

काँग्रेस नगरसेविका पती मोहम्मद अजहर, राष्ट्रवादी नगरसेविका पती बबलू कुरेशी, समाजसेवक मोहम्मद दानिश, अबूझर, अल्ताफ खान, समीर चौधरी आदी जणांसह काही जण नागरिकांना आवाहन करत आहेत.

यावर्षाची ईद साधेपणाने साजरी करा

हेही वाचा - अलिबाग कारागृहातून दोन कैद्यांचे पलायन; एक ताब्यात तर दुसरा फरार

लॉकडाऊन काळात सर्वच धार्मिक स्थळांवर तसेच कार्यक्रमांसाठी गर्दी करण्यावर बंदी आहे. देशातील सर्वच समाजाने आपापले सण सर्व साधेपणाने साजरे केले आहेत. याचप्रकारे मुस्लीम समाजनेही यावर्षाची ईद साध्या स्वरूपात साजरा करूया. बाजारात नवीन कपडे खरेदीसाठी जात आहात तर सोशल डिस्टन्सिंग पाळा, शक्य असेल तर यावर्षी नवीन कापडाची खरेदी करू नये, तसेच जी रक्कम कपड्यांच्या खरेदीसाठी ठेवण्यात आले आहेत, त्याची गरिबांना मदत करा, असेही आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही अटींवर शहरातील सर्वच दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यत उघडण्याची मुभा दिलेली आहे. यापार्श्वभूमीवर कोरोना बाधितांची संख्या वाढू नये, ही खबरदारी घेण्यासाठी हे आवाहन करण्यात येत आहे.

Last Updated : May 26, 2020, 4:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.