बुलडाणा - आमदार संजय गायकवाड यांच्या इनोव्हा कारला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 6 पथके तयार करण्यात आले आहेत.
आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर उभी असलेली इनोव्हा वाहनावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रकार समोर आला होता. ही घटना मंगळवार 26 मेला पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडली. प्रकरणी सकाळीच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आणि इनोव्हा वाहनाचे निरीक्षण केले. प्रकरणी आमदार गायकवाड यांचे चिरंजीव कुणाल गायकवाड यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींवर कलम 435,436,511,427,285 भादवी नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घटनेच्या वेळी नगर परिषदेचे स्ट्रीट लाईट बंद -
ही घटना घडत असताना नगर परिषदेचे स्ट्रीट लाईट बंद करण्यात आले होते, असा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. त्यामुळे पोलीस तपासात नगर परिषदेचे स्ट्रीट लाईट हाताळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी होण्याचे संकेत मिळत आहे.
हेही वाचा - पुण्यात उघडली ऑक्सिजन लायब्ररी! पोस्टकोविड रुग्णांसाठी ठरणार फायदेशीर
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिली घटनेची माहिती -
या घटनेच्या चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सकाळी घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले. तर याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही या घटनेची माहिती दिली आहे. प्रकरणी पोलीस अज्ञातांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कोरोनाकाळात केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत -
मला कोरोनाचे विषाणू मिळाले असते तर ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या तोंडात कोंबले असते. आमदार संजय गायकवाड यांच्या या विधानामुळे राज्यभरात भाजपच्यावतीने आंदोलन पुकारण्यात आले होते. तर मुस्लिम लोक मांसाहार करतात. म्हणून त्यांच्यामध्ये प्रतिकार शक्ती जास्त आहे. यामुळे त्यांच्यामध्ये कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमी आहे. म्हणून या काळात हिंदूंनीदेखील मांसाहार करा. दररोज मटण-चिकन, अंडे खाण्याचा सल्ला आमदार संजय गायकवाड यांनी दिला होता. यावेळी देखील वारकऱ्यांकडून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला होता. वारकरी संप्रदायातील अनेकांनी आमदार गायकवाडांशी मोबाईलद्वारे झालेल्या संभाषणाच्या ऑडियो क्लिपदेखील व्हायरल झाल्या होता.
हेही वाचा - अप्रतिम कलाकृती.. 35 ग्राम रांगोळीचा वापर करत पिंपळाच्या पानावर साकारली गौतम बुद्धांची प्रतिमा