बुलडाणा: जिल्ह्यातील सिंदखेड राजा समृद्धी महामार्गावर रात्री दीड वाजेच्या दरम्यान झालेल्या अपघातात २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. (Buldhana Bus Accident) यावेळी त्यांनी परिसरातील गावकऱ्यांची चर्चा केली व अपघाताचे कारण जाणून घेतले. (CM Shinde and Deputy CM Fadnavis ) तसेच लक्झरी बसचा दरवाजा न उघडल्यामुळे मोठी दुर्दैवी घटना घडल्याचे सांगत प्रवाश्यांचा प्राण वाचवण्यात अपयश आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
-
#बुलढाणा येथे झालेल्या भीषण बस अपघातानंतर आज समृद्धी महामार्गावरील घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis हेदेखील सोबत होते.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथे खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला झालेल्या भीषण अपघातात २५ जणांचा… pic.twitter.com/3oAmPh3nev
">#बुलढाणा येथे झालेल्या भीषण बस अपघातानंतर आज समृद्धी महामार्गावरील घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis हेदेखील सोबत होते.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 1, 2023
समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथे खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला झालेल्या भीषण अपघातात २५ जणांचा… pic.twitter.com/3oAmPh3nev#बुलढाणा येथे झालेल्या भीषण बस अपघातानंतर आज समृद्धी महामार्गावरील घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis हेदेखील सोबत होते.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 1, 2023
समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथे खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला झालेल्या भीषण अपघातात २५ जणांचा… pic.twitter.com/3oAmPh3nev
अपघात पाहिल्यानंतर त्याची भीषणता लक्षात येत आहे. अपघातानंतर गाडी घासत जाऊन त्याच्या डिझेल टॅंकला आग लागली. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू झाले. मात्र, २६ प्रवाश्यांना वाचविता आले नाही ही मोठी दुखद घटना आहे. -- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
-
#बुलढाणा येथे झालेल्या बस अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची देऊळगावराजा येथील रुग्णालयात भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis हेदेखील सोबत होते.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथे खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला अपघात होऊन भीषण आग लागल्याने… pic.twitter.com/A04EVazsw6
">#बुलढाणा येथे झालेल्या बस अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची देऊळगावराजा येथील रुग्णालयात भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis हेदेखील सोबत होते.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 1, 2023
समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथे खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला अपघात होऊन भीषण आग लागल्याने… pic.twitter.com/A04EVazsw6#बुलढाणा येथे झालेल्या बस अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची देऊळगावराजा येथील रुग्णालयात भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis हेदेखील सोबत होते.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 1, 2023
समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथे खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला अपघात होऊन भीषण आग लागल्याने… pic.twitter.com/A04EVazsw6
जीवितहानी टाळू शकलो नाही: यंत्रणांकडून प्राथमिक माहिती घेतली असता संपूर्ण यंत्रणा वेळेवर पोहोचल्याचेही त्यांनी सांगितले; पण दुर्दैवाने जीवितहानी टाळू शकलो नाही. समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण कसे कमी होतील याकडे सरकार प्रयत्नशील आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील 26 जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजिक पिंपळखुटा फाट्याजवळ आज पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला होता. दरम्यान २६ जणांचे मृतदेह ५ ॲम्बुलन्सद्वारे बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. अपघातातील मृतांची ओळख पटवण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेह ठेवण्यात आले आहे.
-
यापुढे समृद्धी महामार्गावर असे अपघात घडू नयेत यासाठी होणाऱ्या अपघातांचा तज्ञांकडून सखोल अभ्यास करून भविष्यात असे अपघात होऊ नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येईल असे सांगितले. https://t.co/7fzLFKdZG1 pic.twitter.com/0uqSSTO0Nr
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">यापुढे समृद्धी महामार्गावर असे अपघात घडू नयेत यासाठी होणाऱ्या अपघातांचा तज्ञांकडून सखोल अभ्यास करून भविष्यात असे अपघात होऊ नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येईल असे सांगितले. https://t.co/7fzLFKdZG1 pic.twitter.com/0uqSSTO0Nr
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 1, 2023यापुढे समृद्धी महामार्गावर असे अपघात घडू नयेत यासाठी होणाऱ्या अपघातांचा तज्ञांकडून सखोल अभ्यास करून भविष्यात असे अपघात होऊ नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येईल असे सांगितले. https://t.co/7fzLFKdZG1 pic.twitter.com/0uqSSTO0Nr
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 1, 2023
ओळख पटवण्याकरिता 'डीएनए' चाचण्या: या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची ओळख पटवण्याकरिता 'डीएनए' किंवा त्याच पद्धतीच्या वैद्यकीय चाचण्या करण्याचे गरजेचे असल्याचे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे. कारण ज्या पद्धतीने हा अपघात झाला आणि त्यामध्ये अक्षरशः प्रवासी भक्षस्थानी सापडले. त्यावरून त्यांचे मोबाईल देखील स्विच ऑफ येत आहेत. त्यामुळे आता ओळख पटवणे आणि त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचणे याकरता युद्ध पातळीवर प्रशासन कामाला लागले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात येऊन मृताची पाहणी केली.
एखाद्या गाडीचा अपघात होतो आणि तिला आग लागून प्रवाश्यांचा होरपळून मृत्यू होतो, अशी घटना मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली आहे. समृद्धी महामार्ग हा मृत्यूचा मार्ग होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. झालेली घटना दुर्दैवी असून यात २६ कुटुंबांची हानी झाली आहे. तपासानंतर घटनेची जबाबदारी घेतली जाईल. -- गुलाबराव पाटील, पालकमंत्री, बुलडाणा
अपघात रोखण्यासाठी कडक कायदे करावे: जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मृतदेहाची पाहणी केली. त्यांनी असे अपघात रोखण्यासाठी अजून कडक कायदे करण्याची वेळ आली तर ती निश्चित केल्या जातील व दोषींना यामध्ये कठोर शासन केल्या जाईल असे बोलताना सांगितले. तसेच समृद्धी महामार्गावरून दळणवळण करताना यावर अपघात कसे रोखता येईल, याचा देखील विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. झालेली घटना अत्यंत मनाला खेद देणारी असून अशा भयानक अपघात भविष्यात रोखण्याकरिता सर्व त्या उपाययोजना केल्या जातील, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
हेही वाचा:
- Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, बसमधील 26 जणांचा होरपळून मृत्यू
- Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, लोखंडी पोलवर आदळली खाजगी बस त्यानंतर समृद्धी महामार्गावर घडला अनर्थ
- Buldhana Bus Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अपघाताविषयी शोक व्यक्त; मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली 5 लाखांची मदत