बुलढाणा Two Nigerian National Arrested: बुलढाणा सायबर पोलिसांनी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोघा नायजेरियन नागरिकांना दिल्लीतूनअटक केली. दीपक शिवराम जैताळकर (Deepak Shivram Jaitalkar) हे मेहकर शहरामध्ये जीवनज्योती क्लिनिक नावाची 'पॅथॉलॉजी लॅब' चालवत आहेत. त्यांना काही महिन्यापूर्वी फेसबुकवर मारिया जोन्स या फेसबुक अकाउंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट (Request on Facebook) पाठवण्यात आली होती. त्यानंतर ऑनलाईन चॅटिंग करत एकमेकांना व्हाट्सअप नंबर देण्यात आले. व्हाट्सअपवर त्यांची मैत्री झाली.
अशी घडली घटना : मारीयाने एक गिफ्ट पाठवले असून त्यासाठी हे पार्सल दिल्ली येथील एअरपोर्टवरून घेण्यासाठी कॉल केला. अज्ञात व्यक्तीने 65 हजार रक्कमेचे ब्रिटिश पाउंड देण्याच्या नावाखाली तसेच इतर कागदपत्रे काढण्यासाठी वेगवेगळ्या तारखेला रक्कम भरण्यासाठी सांगितली. एकूण 62 लाख रुपये देऊन ही गिफ्ट न मिळाल्याने त्यांची ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) झाल्याची बाब लक्षात आली. दीपक जैताळकर यांनी 15 ऑगस्ट रोजी बुलढाणा सायबर क्राईम पोलीस (Buldhana Cyber Police) ठाण्यात तक्रार दिली. यावेळी अज्ञात आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दिल्लीतून आरोपींना घेतले ताब्यात : पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांनी केला असता तांत्रिक पुरावे हाती लागले. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांचे एक पथक आरोपींच्या शोधार्थ दिल्लीला रवाना झाले होते. या पथकाने दिल्लीतून दोन नायजेरियन आरोपींना ताब्यात घेऊन बुलढाणा आणले आहे. निजोस फ्रँक (वय वर्ष 30) रा. संत नगर बुरारी दिल्ली, अलाई विन्सट (दोन्ही नायजेरीयन) असे आरोपींचे नावे आहेत. आरोपींना बुलढाणा सायबर क्राईम पोलीसांनी अटक करून कलम 420, 465, 468, 470,471 तसेच भारतीय दंड संहितासह कलम 66 क, 66 ड, महिती व तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन नायजेरियन आरोपींना अटक : जैताळकर यांनी तब्बल 17 व्यवहारात 62 लाख 69 हजार 700 रुपये ट्रान्सफर केले होते. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक सुनील कळासने, अप्पर पोलीस अधीक्षक बीवी महामुनी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे अशोक लांडे, पोलीस निरीक्षक सारंग नवलकर, सायबर पोलीस स्टेशनचे विलास कुमार सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश नागरे, दीपक जाधव, गजानन गोरले, दीपक जाधव, ऋषिकेश खंडेराव यांनी दिल्ली येथील आरोपींच्या परिसरात जाऊन दोन नायजेरियन आरोपींना अटक करून बुलढाणा येथे आणले होते.
इतका मुद्देमाल केला जप्त : न्यायालयाने आरोपींना सात दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. सदर ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) प्रकरणातील आरोपींकडून एप्पल लॅपटॉप 2 नग, राऊटर 3 नग, आयफोन मोबाइल 3 व इतर मोबाईल 12 नग एटीएम 15, बँक पासबुक तीन असा एकूण 4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच 4 लाख 50 हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास सायबर पोलीस (Buldhana Cyber Police) करत आहे.
हेही वाचा -
- Mumbai Crime News : डार्कनेटच्या सहाय्याने ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांचा भांडाफोड, एक कोटींच्या ड्रग्स जप्तीसह एका नायजेरियन व्यक्तीस अटक
- Nigerian Drug Peddler Arrest: नायजेरियन महिलेला १३ कोटी ड्रग्ससह अटक; महिलेकडून कोकेन जप्त
- One Crore Drugs Seized : 1 कोटींच्या अमली पदार्थांसह नायजेरियन नागरिकाला अटक