ETV Bharat / state

....म्हणून सुषमा स्वराज यांना मुस्लिम समाज कधीही विसरणार नाही - बुलडाणा बातमी

बुलडाण्यात सुषमा स्वराज यांनी जिल्ह्याकरता दिलेल्या पासपोर्ट केंद्रामूळे मुस्लिम समाज कधीही विसणार नाही, अशा प्रतिक्रिया जमाते इस्लामी हिंद बुलडाणा शहर अध्यक्ष तथा मोती मस्जिद इमाम हाफिज मुजाहिद कुरेशी यांनी दिली आहे.

सुषमा स्वराज
author img

By

Published : Aug 8, 2019, 11:53 PM IST

बुलडाणा - भाजपच्या नेत्या तथा देशाच्या माजी विदेशमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाच्या बातमीने देशावर शोककळा परसरली असून बुलडाण्यात स्वराज यांनी जिल्ह्याकरता दिलेल्या पासपोर्ट केंद्रामूळे मुस्लिम समाज कधीही विसणार नाही, अशा प्रतिकीऱ्या जमाते इस्लामी हिंद बुलडाणा शहर अध्यक्ष तथा मोती मस्जिद इमाम हाफिज मुजाहिद कुरेशी यांनी दिली आहे.

....म्हणून सुषमा स्वराज यांना मुस्लिम समाज कधीही विसरणार नाही

मंगळवारी (6 ऑगस्ट) भाजपच्या नेत्या तथा माजी विदेशमंत्री सुषमा स्वराज यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. सुषमा स्वराज हे बुलडाणा जिल्ह्यासाठी आणि विशेष म्हणजे मुस्लिम समाजासाठी कधी न विसरणाऱ्या व्यक्तिमत्व आहे. पूर्वी बुलडाणा जिल्ह्यात पासपोर्ट (पारपत्र) कार्यालय नव्हते. त्यासाठी येथील नागरिकांना तब्बल ४०० किलोमिटरचा प्रावस करून नागपूरला जावे लागत होते.

दरम्यान, हज यात्रेला जाण्यासाठी पासपोर्ट तयार करण्यासाठी ३५ वर्षीय मोहम्मद इमरान हे १४ मे, २०१८ रोजी आपल्या परिवारासह नागपूरला जात होते. त्यावेळी त्यांच्या वाहनाचा अमरावती येथे भीषण अपघात झाला. त्यामध्ये त्यांच्या पत्नी मुमताज अंजुम या जागीच ठार झाल्या होत्या. तर त्यांच्यासह त्यांची तीन मुले जखमी झाली होती त्यात त्यांचा ४ महिन्याचा मुलगा होता. हा मुद्दा अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी लोकसभेत मांडून सुषमा स्वारज यांना प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर २५ जानेवारी, २०१९ रोजी डाक कार्यालयात पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

सध्या बुलडाणा पोस्ट मास्तर छगन गोसावी यांच्या सानिध्यात बुलडाणा डाक कार्यालयात पासपोर्ट अधिकारी म्हणून विजय तायडे काम पाहत आहेत. दररोज सुमारे ४० पासपोर्टचे नोंदणी करण्यात येत असून बुलडाणा जिल्ह्यातीलच नव्हे तर आस-पासच्या जिल्ह्यातील नागरिक पासपोर्ट केंद्राचा लाभ घेत आहे.

यंदाच्यावर्षी हज यात्रेला जाणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या नागरिकांना बुलडाणा पासपोर्ट केंद्रातूनच पासपोर्ट मिळाले आहेत. परदेशी अडकलेल्या अनेक नागरिकांना एका टि्वटवरून मायदेशी आणल्यामूळे मुस्लिम समाज सुषमा स्वराज यांना कधीही विसरणार नाही, अशी प्रतिकिया मोती मस्जिदचे इमाम हाफिज मुजाहिद कुरेशी यांनी दिली आहे.

Intro:Body:
स्पेशल...

स्टोरी:- म्हणून स्व.सुषमा स्वराज यांना मुस्लिम समाज कधीही विसरणार नाही....

बुलडाणा:- भारतीय जनता पार्टीच्या नेत्या तथा देशाच्या माजी विदेशमंत्री स्व.सुषमा स्वराज यांच्या निधनाच्या बातमीने देशावर शोककळा परसरली असून बुलडाण्यात स्व.सुषमा स्वराज यांनी जिल्ह्याकरिता दिलेले पासपोर्ट केंद्रामूळे मुस्लिम समाज कधीही विसणार नाही त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रतिकीऱ्या जमाते इस्लामी हिंद बुलडाणा शहर अध्यक्ष तथा मोती मस्जिद इमाम हाफिज मुजाहिद कुरेशी यांनी दिली आहे.तर शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव आणि जिल्हा उपाध्यक्ष संजय गायकवाड यांनी स्व.सुषमा स्वराज यांच्याप्रति शोकसंवेधना व्यक्त केल्या..

काल मंगळवारी 6 ऑगस्ट रोजी भाजपच्या नेत्या तथा माजी विदेशमंत्री स्व.सुषमा स्वराज यांचा अचानक रात्री ह्र्दय विकाराच्या झटक्याने निधन देशावर शोककळा पसरली देशातील मोठं-मोठ्या नेत्यांनी आप-आपली शोकसंवैदना व्यक्त केल्या.स्व.सुषमा स्वराज हे बुलडाणा जिल्ह्याकरिता आणि विशेष म्हणजे मुस्लिम समाजासाठी कधी न विसरणारा विषय आहे.तो मुस्लिम समाजाच्या इमाम हाजीफ मुजाहिद कुरेशी यांनी आपल्या प्रतिक्रीयेमधून व्यक्त ही केलीय आहे.तो म्हणजे स्व.सुषमा स्वराज यांनी बुलडाण्यात दिलेला पासपोर्ट केंद्राची सुविधा..बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्ट करिता बुलडाण्यापासून तब्बल 400 किलोमीटर अंतरावर असलेले नागपूर येथे जावा लागत होते. दरम्यान हज यात्रेसाठी जाण्याकरिता पासपोर्ट तय्यार करण्यासाठी 35 वर्षीय मोहम्मद इमरान हे 14 में 2018 रोजी रात्री आपल्या परिवारासोबत ज्यामध्ये त्यांची पत्नी मुमताज अंजुम,दोन मुली 13 वर्षीय कशीष फतेमा,5 वर्षीय जोया आणि 4 माहिण्याचा मुलगा अशजाज हे वाहनातून नागपूर जात असतांना अमरावती जिल्ह्यात त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला होता या अपघातामध्ये पाच जणांपैकी इमरानची पत्नी मुमताज अंजुम हे घटनास्थळीच ठार झाले होती तर त्यांचा इमरान गंभीर जखमी झाले होते तर तिन्ही चिमुकले वाचले होते.हा मुद्दा अमरावतीचे शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी लोकसभेत मांडून माजी विदेश मंत्री स्व.सुषमा स्वराज यांना प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट केंद्र उघडण्याची मागणी केली होती आणि स्व.सुषमा स्वराज यांनीही या मागणीचा समर्थन दिले होते तर शिवसेनेचे बुलडाणा खासदार प्रतापराव जाधव यांनीही पाठपुरावा केला आणि 25 जानेवारी 2019 रोजी बुलडाणा येथे डाक कार्यालयात पासपोर्ट कार्यालयाचे उदघाटन करून केंद्र सुरू करण्यात आला तेव्हा पासून बुलडाणा पोस्ट मास्टर छगन गोसावी यांच्या सानिध्यात बुलडाणा डाक कार्यालयात पासपोर्ट अधिकारी म्हणून विजय तायडे काम पाहत आहे.दररोज 40 पासपोर्टचे नोंदणी करण्यात येत असून बुलडाणा जिल्ह्यातीलच नव्हे तर आस-पासच्या जिल्ह्यातील नागरिक पासपोर्ट केंद्राचा लाभ घेत आहे.विशेष म्हणजे 2019 च्या या वर्षी हज यात्रेला जाणाऱ्या बुलडाणा जिल्हयातील मुस्लिम समाजाच्या नागरिकांना बुलडाणा पासपोर्ट केंद्रातूनच पासपोर्ट मिळाले आहे.आणि बाहेर देशात जे अडकलेल्या नागरिकांना एका टिव्हीट वर आपल्या देशात आणल्यामूळे म्हणून मुस्लिम समाज स्व.सुषमा स्वराज यांना कधीही विसरणार नाही अशी प्रतिकिया मोती मस्जिद इमाम हाफिज मुजाहिद कुरेशी यांनी दिली आहे.ही मुस्लिम समाजाकडून माजी विदेश मंत्री स्व.सुषमा स्वराज यांना खरी श्रद्धांजली बुलडाणा जिल्हाकारांनी दिली आहे तर शिवसेनेचे बुलडाणा खासदार प्रतापराव जाधव आणि शिवसेना जिल्हाउपाध्यक्ष संजय गायकवाड यांनी संवेदना व्यक्त केल्या..

बाईट:- 1) हाफिज मुजाहिद कुरेशी,शहर अध्यक्ष जमाते इस्लामी हिंद बुलडाणा तथा मोती मस्जिद इमाम हाफिज

2) मोहम्मद मुश्ताक,चिखली रहवासीं,पासपोर्ट तय्यार करणारे

3) प्रतापराव जाधव,शिवसेना खासदार बुलडाणा

4) संजय गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष,शिवसेना

5) छगन गोसावी,पोस्ट मास्टर,डाक कार्यालय बुलडाणा

6) मोहम्मद इमरान,ज्यांचा अपघात झाला होता..

-वसीम शेख,बुलडाणा-

टीप:- बाईट मध्ये हिंदी आणि मराठी बाईट्स आहे कृपया चेक करावे..
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.