बुलडाणा - अनंत चतुर्थीनिमित्त आज संपूर्ण राज्यात लाडक्या गणपती बाप्पाला जड अंतकरणाने गणेश भक्तांनी निरोप दिला. शहर तसेच खामगावसह जिल्ह्यात सकाळी नऊ वाजल्यापासूनच विसर्जनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी खामगावातील पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या मानाच्या लाकडी गणपतीला स्थान मिळाले.
गणेश विसर्जनानिमित्त शहरातील सरकारी तलाव या ठिकाणी लहान-मोठ्या गणपती बाप्पाल आज निरोप देण्यात आला. त्याचबरोबर संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात देखील बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनवणी करून जड अंतकरणाने निरोप देण्यात आला. सकाळी नऊ वाजल्यापासूनच प्रमुख गणेश मंडळांनी गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात केली होती. रात्री बारा वाजेपर्यंत बाप्पाचे विसर्जन चालणार आहे.
हेही वाचा- कर्जासाठी बँकेसमोर शेतकऱ्यांचे मुंडन आंदोलन; तब्बल ४ महिन्यांपासून शेतकऱ्यांची कुचेष्टा
यंदा मिरवणुकीमध्ये मल्लखांब, लेझीम पथक आणि महिला ढोल पथक हे भाविकांच्या आकर्षनाचा विषय ठरला. यावेळी खामगावात नेहमीप्रमाणेच विसर्जनकरिता मानाचा गणपती म्हणजे लाकडी गणपतीला पहिला स्थान मिळाला. यावेळी, गणेश विसर्जन शांततेत व्हावे यासाठी पोलीस प्रशासनाने जिल्हाभर चोख पोलीस बंदोबस्त लावला होता.