ETV Bharat / state

बुलडाण्यात 94 लाखांचा 27 क्विंटल गांजा जप्त; दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात - बुलडाणा स्थानिक गुन्हे विभाग

बुलडाणा शहरालगत असलेल्या येळगाव शिवारातील गौतमनगर परिसरातील एका घरात गांजा साठवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने साठवणूक केलेल्या गोदामावर छापा टाकला. तेथून 27 क्विंटल गांजा जप्त करण्यात आला.

marijuana
गांजा
author img

By

Published : Apr 11, 2020, 10:24 AM IST

बुलडाणा - लॉकडाऊनच्या काळात मोठी कमाई करण्यासाठी साठवून ठेवण्यात आलेला 94 लाखांचा 27 क्विंटल गांजा जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. या प्रकरणी मोताळा तालुक्यातील कुऱ्हा गोतमारा येथील मनोज झाडे आणि गजानन मंजा या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

बुलडाण्यात 94 लाखांचा 27 क्विंटल गांजा जप्त

बुलडाणा शहरालगत असलेल्या येळगाव शिवारातील गौतमनगर परिसरातील एका घरात गांजा साठवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने साठवणूक केलेल्या गोदामावर छापा टाकला. तेथून 27 क्विंटल गांजा जप्त करण्यात आला. हा गांजा आंध्र प्रदेशातून आणण्यात आला होता.

आरोपी लॉकडाऊनच्या काळात हा गांजा दुचाकीने जिल्ह्यात फिरून विकणार होते. या प्रकरणात आणखी काही आरोपी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक इंगळे, पीएसआय इनामदार, सुधाकर काळे, अताउल्ला खान, सुनील खरात, संजय नागवे, विजय सोनुने, अमोल अंभोरे, नदीम शेख यांनी सहभाग घेतला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.