बुलडाणा - ७३ वा भारतीय स्वातंत्र्यदिनाचा शासकीय ध्वजारोहण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात कामगारमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.संजय कुटे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पोलीस दलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
या ध्वजारोहण कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ.निरुपमा डांगे, पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी-अधिकारी शनमुखराजन यांसह शासकीय कर्मचारी व विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कोल्हापूर, सांगली येथील पुरात मरण पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच तंबाखू मुक्तीची शपथ यावेळी देण्यात आली.