बुलडाणा - करोडो चाहत्यांना आपल्या अदाकारीने भुरळ पाडणार्या परंतू ड्रक्स प्रकरणात मलीन झालेल्या कलाकारांना आझाद हिंद संघटनेच्यावतीने ड्रग्जभूषण पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ड्रग्ज प्रकरणातील कलाकारांना मिळालेले भारताचे सर्वोच्च पुरस्कार त्यांनी प्रकरणातून निर्दोष मुक्तता होईपर्यंत परत करावे. अन्यथा अशा कलाकारांच्या चित्रपटांवर बंदी घालून चित्रपटांचे प्रदर्शन थांबविण्यात येईल असा इशारा आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.सतिशचंद्र रोठे यांनी दिला आहे.
'ड्रग्ज प्रकरणातील कलाकारांनी मिळालेले सर्वोच्च पुरस्कार परत करावे' - ड्रग्ज प्रकरणातील कलाकारांनी सर्वोच्च पुरस्कार परत करण्याची मागणी
फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीतील करण जोहर, अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, कंगना रनौत, एकता कपूर, अदनान सामी, सुरेश वाडकर यांनाही पद्मश्री अवार्ड देण्यात आलेला आहे. तर करण जोहरने आयोजित केलेल्या ड्रग्स पार्टीमध्ये ड्रग्स वापर झाल्याचे चौकशीत निष्पन्न झालेले आहे. त्यामुळे करण जोहरसह ड्रग्स प्रकरणात कलाकारांची नावे आलेली आहे. ड्रग्ज प्रकरणात फिल्म इंडस्ट्रीतील दुसरे नाव म्हणजे सारा अली खान असून सारा आली खान यांनाही उत्कृष्ट अभिनेत्रीचे दहा पुरस्कार मिळालेले आहेत.