बुलडाणा - शहरातील विदर्भ हाऊसिंग सोसायटीमध्ये सख्ख्या भावानेच बहिणीची हत्या केल्याची घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. अंकिता शर्मा, असे मृत बहिणीचे नाव असून पोलिसांनी आरोप भावाला ताब्यात घेतले आहे.
सागर शर्मा, असे आरोपीचे नाव आहे. आज सकाळच्या सुमारास त्याने सख्खी बहिण अंकिता शर्माला मारहाण केली. त्यानंतर गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतः बहिणीचा खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता अंकिता बाथरुममध्ये मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांना आरोपी सागरला ताब्यात घेतले असून त्याने खून का केला? याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. आरोपी सागर शर्मा हा सराईत गुन्हेगार असून याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.