ETV Bharat / state

बुलडाण्यात वडील व दीड वर्षाच्या बाळाचे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह - buldana suicide news

संग्रामपूर तालुक्यातील ग्राम कुंदेगाव येथे दीड वर्षाच्या बाळासह त्याच्या वडिलांचा मृतदेह एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

suicide
गळफास घेत आत्महत्या
author img

By

Published : May 28, 2021, 10:28 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील ग्राम कुंदेगाव येथे दीड वर्षाच्या बाळासह त्याच्या वडिलांचा मृतदेह एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना शुक्रवारी (28 में) उघडकीस आली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वडिलाने पहिल्यांदा आपल्या मुलाला गळफास दिला. नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दिनेश पुंडलिक वानखेडे असे वडिलांचे नाव असून, दीड वर्षाच्या मुलाचे नाव रोशन दिनेश वानखेडे असे आहे.

हेही वाचा - 'ईटीव्ही भारत' इम्पॅक्ट - एसटीच्या १३०० सुरक्षा रक्षकांना मिळणार थकीत वेतन

वडील दोरीला तर बाळ दुपट्ट्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले

मुत दिनेश पुंडलिक वानखडे (वय ३०) वर्ष व दीड वर्षाचा मूलगा रोशन दिनेश वानखडे हे दोघेही कुंदेगाव शिवारातील एका लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आले. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तामगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह खाली उतरवण्यात आले. या प्रकरणी मृताचा भाऊ राजेश पुंडलिक वानखडे याने तामगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अकास्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्सटेबल नंदकिशोर तिवारी करत आहेत. वडील आणि दीड वर्षाचा मुलगा झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा - पालखी सोहळ्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीनंतर अंतिम निर्णय घेऊ - अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.