ETV Bharat / state

भाजपकडून आमिष दाखवून दबाव टाकत केले जातात पक्षप्रवेश - मुकुल वासनिक

वासनिक हे बुलडाणा आणि चिखलीत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीला आले होते. त्यादरम्यान त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून जिल्ह्यातील नांदुरा, चिखली आणि बुलडाणा तालुक्यात जाऊन काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत.

कॉग्रेसचे राष्ट्रीय नेते
author img

By

Published : Sep 1, 2019, 8:04 PM IST

Updated : Sep 1, 2019, 11:54 PM IST

बुलडाणा - भारतीय जनता पक्ष इतर पक्षांच्या लोकांना मोठी आमिष दाखवून, दबाव आणून पक्ष प्रवेश करवून घेत आहे. त्यामुळे लोकशाही मूल्ये धोक्यात आली आहेत. याला आम्ही बळी पडणार नाही, उलट काँग्रेस पक्ष मोठ्या जोमाने कामाला लागला आहे. पुढील काळात आम्ही मोठे यश प्राप्त करु, असा विश्वास व्यक्त करून वंचित बहुजन आघाडी निवडणुकीनंतर विरोधी पक्ष राहतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य हे हास्यास्पद असल्याचे, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते मुकुल वासनिक यांनी सांगितले.

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते मुकुल वासनिक

ते बुलडाणा आणि चिखलीत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीला आले होते. त्यादरम्यान त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून जिल्ह्यातील नांदुरा, चिखली आणि बुलडाणा तालुक्यात जाऊन काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहे. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्ष हा वंचित बहुजन आघाडी राहील, या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेवर त्यांनी टीका केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हे अत्यंत हास्यास्पद आहे. निवडणूक आतापर्यंत जाहीर झालेली नाही. पण निवडणुकीचा परिणाम कसा राहील याच्या संदर्भात मुख्यमंत्री आजच सांगू लागले आहे. कोणाचे सरकार येईल कोण विरोधी पक्षांमध्ये राहील, अशा सर्व बाबींबद्दल मुख्यमंत्री कसे बोलू शकतात याचे मला पूर्णपणे आश्चर्य वाटत आहे.

ते जे काही मागच्या निवडणुकीमध्ये बोलले होते त्याचे मला स्मरण आहे. त्यांनी शेतकऱ्यांना आणि तरुणांना अनेक प्रकारची आश्वासने दिली होती. महाराष्ट्राचा औद्योगिक विकास कसा केल्या जाईल, महाराष्ट्रामध्ये रोजगाराचा प्रश्न कसा सोडविला जाईल, शेती उत्पादन कसे वाढवल्या जाईल, अश्या प्रकारच्या विविध गोष्टीच्या संदर्भात त्यांनी आश्वासन दिली. मात्र शेतकऱ्यांच्या कर्जाबद्दल, विम्याबद्दल काय झाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल काय झाले, या सर्व परिस्थितीबद्दल आज महाराष्ट्राच्या लोकांना जाणीव आहे.

आज देशाची आर्थिक परिस्थिती बिकट अवस्थेत आहे. मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली आहे. त्यासंदर्भातील आकडेवारी आज आपल्यासमोर येत आहे. अत्यंत कठीण परिस्थितून आज देश आणि राज्य जात आहे. आणि आम्हाला खात्री आहे की येत्या काळामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जागरूक मतदार हा आपला कौल दिल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया मुकुल वासनिक यांनी दिली.

राहुल बोन्द्रेंना मुकुल वासनिक यांचे समर्थन

चिखली येथील आमदार राहुल बोन्द्रे हे काँग्रेस सोडून भाजप किंवा शिवसेनेत जात असल्याची चर्चा आहे. त्यावर विचारले असता वासनिक यांनी राहुल बोन्द्रे यांच्याच नेतृत्वात जिल्ह्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ यश मिळणार असल्याचे सांगत मूळ प्रश्नाला बगल दिली.

वंचित सोबत काँग्रेस पक्ष युती करणार का ? असे विचारले असता ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकी संदर्भात प्रदेश काँग्रेस कमिटीने एक समिती स्थापन केली आहे. आघाडी संदर्भात कुणासोबत युती करायची कुणासोबत नाही याबाबत त्या समितीला सर्व अधिकार दिले आहेत, असे वासनिक यांनी सांगितले. दरम्यान, बुलडाणा येथील स्थानिक विश्रामगृहात यावेळी मुकुल वासनिक यांनी पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या संजयसिंह राजपूत यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेतली.

Intro:Body:बुलडाणा : भारतीय जनता पक्ष इतर पक्षांच्या लोकांना मोठी आमिषे दाखवून व दबाव आणून पक्ष प्रवेश करवून घेत आहे , त्यामुके लोकशाही मूल्य धोक्यात आली आहे , याला आम्ही बळी पडणार नाही उलट मोठ्या जोमाने कोंग्रेस पक्ष कामाला लागले आहे. त्यानुसार आमच्या भेटिगाठी सुद्धा सुरु आहेत, पुढील काळात आम्ही मोठे यश प्राप्त करु असा विश्वास व्यक्त करून वंचित बहुजन आघाडी निवडणुकीनंतर विरोधी पक्ष राहतील मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांच्या वक्तव्य हस्यसस्पद असल्याचे सांगत कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते मुकुल वासनिक यानी मागील निवडणुकीत फडवणीस यांनी आश्वासनाचा पाढा वाचत फडणवीस सरकारवर टीका बुलडाणा आणि चिखलीत काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्या भेटी दरम्यान केली

काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून जिल्ह्यातील नांदुरा, चिखली आणि बुलडाणा तालुक्यात जाऊन कोंग्रेस कार्यकर्ते व पदाधिकार्यांच्या ते भेटी घेत आहे , यावेळी पत्रकारांनी विधानसभा निवडणुकी नंतर विरोधी पक्ष हा वंचित बहुजन आघाडी राहील या मुख्यमंत्रीच्या भाष्यावर टीका करताना वासनिक म्हणाले हे अत्यंत म्हणजे हास्यास्पद आहे ही निवडणूक आतापर्यंत जाहीर झालेल्या नाही पण निवडणुकीचा परिणाम कसा राहील यांच्या संदर्भात मुख्यमंत्री आजच सांगू लागलेले आहे कोणाचं सरकार येईल कोण विरोधी पक्षांमध्ये राहील अशा या सर्व बाबींबद्दल मुख्यमंत्री कशे बोलू शकतात याचं मला पूर्णपणे आश्चर्य आहे त्यांनी जे-जे काही मागच्या निवडणुकीत मध्ये बोललेले होते त्यांचे मला स्मरण आहे.त्यांनी शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या आश्वासने दिली होती तरुणांना अनेक प्रकारच्या आश्वासने दिली होती . महाराष्ट्राचा कसा औद्योगिक विकास केल्या जाईल महाराष्ट्रामध्ये रोजगाराचा प्रश्न कसा सोडवण्याचा जाईल. शेती उत्पादन कसं वाढवल्या जाईल अश्या प्रकारच्या विविध गोष्टीच्या संदर्भात आश्वासन दिल पण शेतकऱ्यांच्या कर्जाबद्दल ,विम्याबद्दल काय झालं शेतकऱ्यांच्या आत्महत्या बद्दल काय झालं या सर्व परिस्थितीबद्दल आज महाराष्ट्राच्या लोकांना जाणीव आहे.मागील निवडणुकीत भाजपने एक नारा दिला होता की कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा आज देशाची आर्थिक परिस्थिती बघा कश्या प्रकारची आर्थिक परिस्थिती निर्माण झालेली आहे किती मोठ्या प्रमाणावर लोक जे नोकऱ्यांमध्ये होते ते कशे बेरोजगार होतात आहे,बेकार होतात आहे.याची आकडेवारी आज आपल्यासमोर येत आहे.अत्यंत कठीण परिस्थितून आज देश आणि महाराष्ट्र जात आहे आणि आम्हाला खात्री आहे या येत्या काळामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जागरूक मतदार हा आपला कौल दिल्याशिवाय राहणार नाही म्हणाले

बाईट - मुकुल वासनिक, (राष्ट्रीय सचिव -कोंग्रेस )

चिखली येथील आमदार राहुल बोन्द्रे हे कोंग्रेस सोडून भाजपा किवा शिवसेना पक्षात जात असल्याची चर्चा जोरात आहे त्यावर छेडले असता वासनिक त्यानी, राहुल बोन्द्रे यांच्यच नेतृत्वात जिल्ह्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर मोठ यश मिळणार असल्याने त्या प्रश्नाला त्यानी बगल दिली ...

बाईट - मुकुल वासनिक, (राष्ट्रीय सचिव -कोंग्रेस )

वंचित सोबत काँग्रेस पक्ष युती करणार का ? असे विसरले असता ते म्हणालेकी, विधानसभा निवडणुकी संदर्भात प्रदेश काँग्रेस कमिटीने एक समिती स्थापन केली आहे. आघाडी संदर्भात कुणासोबत युती करायची कुणासोबत नाही याच त्या समितीला सर्व अधिकार दिले आहे. असे वासनिक यांनी सांगितले.बुलडाणा येथील स्थानिक विश्राम गृहात यावेळी मुकुल वासनिक यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या संजयसिंह राजपूत यांच्या परिवारांची सांत्वनपर भेट घेतली..

बाईट - मुकुल वासनिक, (राष्ट्रीय सचिव -कोंग्रेस )

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
Last Updated : Sep 1, 2019, 11:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.