बुलडाणा - जिल्ह्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी चारा सडल्याचे चित्र आहे. त्यातच कापसाच्या पिकांमध्ये 'ढोर काकडा' गवत वाढल्याने जनावरांना ऑग्झॉलिक विषबाधेची लागण होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
हेही वाचा - 'आप' पक्ष दिल्लीत बॉम्ब फेकण्याचे आणि बस पेटवण्याचे काम करतयं'
माळरानावर चारा नसल्याने परिसरातील पशूपालक आपली जनावरे कपाशीच्या पिकात चरायला सोडत आहेत. मात्र, त्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. हे गवत खाल्ल्यामुळे जनावरांच्या लघवीसह इतर काही प्रक्रिया बंद होत आहेत. मांड्यांवर सूज आणि शरीर फुगत असल्याने जनावरांचे चारा, पाणी बंद होत आहे. वेळीच उपचार न झाल्यास या विषबाधेमुळे जनावरे दगावण्याची शक्यताही बळावली आहे.
हेही वाचा - अखेर आलिया-रणबीरच्या 'ब्रम्हास्त्र'ची तारीख ठरली
सिंदखेडराजा तालुक्यातील वाघजाई येथील शेतकरी विष्णू सानप यांच्या मालकीच्या संकरित गायीचा नुकताच या चाऱ्यामुळे मृत्यू झाला. ही गाय जवळपास ४५ हजार रुपये किमतीची होती. सोनोशी येथील शेषराव मुंढे यांच्या मालकीचा बैल, चोरपांग्रा येथील गजानन चव्हाण यांच्या मालकीची गायही या गवतामुळे अत्यवस्थ झाली आहे. या चाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.