बुलडाणा : आरोग्य विभागातील पदभरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या आरोप करत ही परीक्षा रद्द करून एमपीएससीमार्फत परीक्षा घेण्याची मागणी बुलडाण्यातील परीक्षार्थ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
54 पदांच्या 8 हजार 500 जागांसाठी आहे भरती
राज्य सरकारच्या आरोग्य विभागातील 54 विविध पदांच्या 8 हजार 500 जागांच्या भरतीसाठी महाआयटीमार्फत नेमण्यात आलेल्या खाजगी कंपनीकडून राज्यभरात 28 फेब्रुवारी रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत अनेक परिक्षा केंद्रांवर गैरप्रकार झाल्याच्या आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. परीक्षेदरम्यान काही ठिकाणी डमी उमेदवारांना पकडण्यात आले. तर काही परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका एक ते दिड तास उशिराने मिळाली. नागपूर येथील केंद्रावरील परीक्षा सुरू होण्याच्या आधीच पेपर फुटल्याची तक्रार असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
आरोग्य विभागाच्या परीक्षेत गैरप्रकाराचा आरोप, एमपीएससीकडून परीक्षा घेण्याची बुलडाण्यातील विद्यार्थ्यांची मागणी - buldana students demand
भरतीसाठी महाआयटीमार्फत नेमण्यात आलेल्या खाजगी कंपनीकडून राज्यभरात 28 फेब्रुवारी रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत अनेक परिक्षा केंद्रांवर गैरप्रकार झाल्याच्या आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.