ETV Bharat / state

Buldana Murder Case : भडगाव शिवारातील महिलेच्या खून प्रकरणी चार दिवसातच आरोपीला अटक - Woman stoning to death

रायपूर पोलीस स्टेशन अंतर्गत भडगाव शिवारात एका 50 वर्षांच्या (Woman stoning to death) महिलेची दगडाने ठेचून हत्या (Buldana Murder Case) करण्यात आल्याची घटना 14 डिसेंबरला उघडकीस आली होती. लता मुरलीधर कोतकर असे मृतक महिलेचे नाव होते. परंतु आरोपी अज्ञात होता. मात्र रायपूर पोलिसांनी तपास चक्र फिरवून, आरोपी बाळासाहेब बारहाते (रा. साडेगाव, जिंतूर जिल्हा परभणी हल्ली (सैलानी जिल्हा बुलडाणा) याला जेरबंद (Accused arrested) करण्यात यश मिळविले आहे. याबाबत रायपूर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेण्यात येऊन उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांनी माहिती दिली. (Latest news from Buldana), (Buldana Crime)

Buldana Murder Case
महिला हत्याकांड, बुलडाणा
author img

By

Published : Dec 17, 2022, 4:56 PM IST

बुलडाणा : दिवसागणिक हत्या, हाणामारी सारख्या घटनांनी गुन्हेगारी वाढत चालली आहे. दरम्यान 10 वर्षापासून सैलानी येथे वास्तव्यास असलेल्या पन्नास वर्षीय महिलेची हत्या (Woman stoning to death) केल्याची घटना 14 डिसेंबरच्या सायंकाळी समोर आली. रायपूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात (Accused arrested) आला. फिर्यादी विकास मुरलीधर कोतकर वय 27 वर्ष राहणार सुलतानपूर, तालुका खुलताबाद, जिल्हा औरंगाबाद याने याबाबत तक्रार दिली. तक्रारीत नमूद केले होते की, त्यांची आई लता मुरलीधर कोतकर मागील 10 वर्षांपासून पायाचा त्रास असल्याने ती सैलानी येथे नेहमी दर्शनाकरिता येत होती व तेथेच राहत होती. (Buldana Murder Case)

उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम हत्याकांडाची माहिती देताना

काय आहे प्रकरण ?
14 डिसेंबरच्या रात्री 9 वाजेच्या सुमारास फिर्यादीची बहीण सपना दीपक खिल्लारे हिने फोन करून सांगितले की, ती आईला भेटण्यासाठी 2 दिवसांपूर्वी सैलानी येथे आली होती परंतु तिची आई सोबत भेट झाली नाही. सपना ही सैलानी येथे हजर असताना तिला लोकांकडून समजले की, सैलानीला लागूनच असलेल्या भडगाव शिवाराच्या जंगलामध्ये तिच्या आईचे प्रेत पडलेले आहे. तिने जाऊन पाहिले असता चेहरा व डोके पूर्णपणे दगडाने ठेचलेले होते. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान रायपुर पोलिसांनी तपास चक्र फिरवून आरोपींना शोधण्यात यश मिळविले आहे.

कानून के हाथ लंबे होते है : मारेकरी अज्ञात असल्याने गुन्ह्याचा तपास क्लिष्ट होता. परंतु कानून के हाथ लंबे होते है! हे रायपूर पोलिसांनी दाखवून दिले. गुप्त माहितीच्या आधारे मारेकर्‍याचा शोध घेण्यात आला असता, मृतक महिले सोबत नेहमी राहणारा आरोपी बाळासाहेब बारहाते राहणार साडेगाव,जिंतूर जिल्हा परभणी हल्ली ( सैलानी जिल्हा बुलडाणा) यांनी जुन्या वादातून हा खून केल्याचे उघड झाले आहे. 13 डिसेंबर रोजी मारेकर यांनी मूर्तक महिलेला भडगाव जंगलात जळन आण्यासाठी पाठविले होते. बदल्याची भावना भडकल्याने त्याने एकांतात तिच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला. चेहरा ओळखू येऊ नये म्हणून दगडाने ठेचून चेंदामेंदा केला. मात्र आरोपीला रायपूर पोलिसांनी 4 दिवसातच अटक केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.