ETV Bharat / state

बुलडाण्यात कोरोनामुळे 11 वा बळी; मलकापूर येथील महिलेचा मृत्यू - बुलडाणा कोरोना मृत्यूसंख्या बातमी

गुरुवारी एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तिचा पॉझिटिव्ह कोरोना चाचणी अहवाल आज प्राप्त झाला आहे. यामुळे, जिल्ह्यातील मृतांची संख्या 11 झाली आहे. तर, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 170 कोरोनाबाधित रुग्ण असून सध्या रुग्णालयात 24 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बुलडाण्यात कोरोनामुळे 11 वा बळी
बुलडाण्यात कोरोनामुळे 11 वा बळी
author img

By

Published : Jun 26, 2020, 3:05 PM IST

बुलडाणा : जिल्ह्यात मंगलगेट मलकापूर येथील पुन्हा एका 67 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सदर महिलेचा 24 जून रोजी मृत्यू झाला होता. तर, कोरोनामुळे जिल्ह्यात 11 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेल्याची नोंद झाली आहे.

सदर तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या स्वॅबच्या अहवालांपैकी गुरुवारी 25 जूनरोजी 28 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 27 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून मलकापूर येथील मृत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच आतापर्यंत 2 हजार 353 निगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाल्या आहेत. तर, आतापर्यंत 135 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 135 आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 170 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी 11 मृत आहे. तर, सध्या रुग्णालयात 24 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजरोजी 53 अहवालाच्या प्रतीक्षेत असलेले नमुने आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2 हजार 353 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.