बुलडाणा - तुम्हाला विचारलं की पक्ष्याच्या जातीतील काळ्याकुट्ट रंगाचा पक्षी कोणता, तर पहिलं नाव येते ते म्हणजे कावळ्याचे,आणि जर तुम्हाला विचारले की, तुम्ही कधी पांढरा कावळा पाहिला का ? तर तुमचे उत्तर असेल की, पांढऱ्या रंगाचा कुठं कावळा असतो का? मात्र तुमचे उत्तर चुकीचे आहे. कारण बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील बोरीअडगाव परिसरात एका पांढऱ्या रंगाच्या कावळ्याचे दर्शन होत आहे. गावातील शिवाजी पाटील यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात या पांढऱ्या कावळ्याचा व्हिडिओ कैद केला. हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे हा पांढरा कावळा गेल्या काही दिवसांपासून नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून याला पाहण्यासाठी लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पांढरा कावळाच असल्याची शिवाजीराव पाटलांना पटली खात्री
बुलडाण्याच्या खामगाव तालुक्यात आढळला पांढरा कावळा; पक्षी प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण - पांढरा कावळाच असल्याची शिवाजीराव पाटीलांना पटली खात्री
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरीअडगाव येथील शिवाजीराव पाटील हे आपल्या घराजवळ बसलेले असताना त्यांना या परिसरातील झाडावर पांढरा कावळा दिसून आला आहे.