बुलडाणा - शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील राजूर घाटात 400 फूट दरीत ट्रक कोसळून अपघात झाल्याची घटना आज मंगळवारी 11 में रोजी घडली. या अपघातात ट्रक चालक पीर मोहम्मद यांचा जागीच मृत्यू झाला असून शेद्रुन मौज खान जखमी झाला आहे.
अग्निशामक दलाने मृतदेह दरीतून काढला -
घटनेची माहिती रस्त्यावरून जाणाऱ्यांनी बुलडाणा शहर पोलिसांना दिली, पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. ट्रक 500 फूट खोल दरीत कोसळल्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशामक वाहनातील दोरीच्या साहाय्याने पोलीस व नगर परिषदेचे कर्मचारी दरीत उतरून मृतदेह व जखमीला वर काढण्यात आले. जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, पुढील तपास बुलडाणा शहर पोलीस करीत आहे.