ETV Bharat / state

बुलडाण्यात 14 वर्षांच्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट - विद्यार्थी आत्महत्या

धरणगाव येथील शाळकरी मुलगा प्रणव निवृत्ती इंगळे याने आई-वडील शेतात गेले असताना दुपारच्या सुमारास घरातील छतास ओढणी आणि नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतला.

आत्महत्या करणारा मुलगा
author img

By

Published : Jul 25, 2019, 9:00 PM IST

बुलडाणा - मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथील १४ वर्षांच्या एका विद्यार्थ्याने घरात कुणीही नसताना ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलीस तपास करत आहेत.

बुलडाण्यात 14 वर्षांच्या विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली

धरणगाव येथील शाळकरी मुलगा प्रणव निवृत्ती इंगळे याने आई-वडील शेतात गेले असताना दुपारच्या सुमारास घरातील छतास ओढणी आणि नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतला. प्रणव शाळेत गेला की नाही, हे बघायला गेले असता शेजारच्यांच्या ही बाब लक्षात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. यानंतर त्यांनी घटनेचा पंचनामा करत प्रणवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.

प्रणवने आत्महत्या का केली, याचे कारण अद्यापही स्पष्ट होवू शकले नाही. या घटनेने इंगळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Intro:Body:बुलडाणा -- बुलडाणा जिल्ह्याच्या मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथील  १४ वर्षीय विद्याथ्याने घरात कोणी नसतांना ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडलीय ..आत्मत्येचे कारण अद्यापही अस्पष्ठ असून पोलिसांकडून तपास सुरूय .. धरणगाव येथील शाळकरी मुलगा प्रणव निवृत्ती इंगळे , वय १४ वर्ष  या विद्याथ्याने त्याचे आई-वडील शेतामध्ये गेले असताना दुपारी घरात कोणीही नसल्याचे पाहून घरातील छताला ओढणीच्या आणि  नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केलीय ..  ही बाब तो शाळेत जात नाही का हे बघावयास गेलेल्या शेजारच्यांच्या लक्षात आली.. .या घटनेची माहिती पोलिस प्रशासनाला कळताच त्याठिकाणी पोलिसांनी  पंचनामा करीत त्याचा मृतदेह शवविच्छेदना करीता मलकापूर उपजिल्हा रूग्णालयात पाठविलाय .. मात्र प्रणव ने  आत्महत्या का केली ? याचे कारण अद्यापही स्पष्ट होवू शकले नाही.. .या घटनेने मात्र इंगळे परिवारवार दुःखाचा डोंगर कोसळला असून पोलीस अधिकचा तपास करीत आहेत .. 

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.