बुलढाणा : बुलढाणा शहरात धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील वावरे ले आऊट येथील वावरे यांच्या बिल्डिंगचे सुरू असलेल्या बांधकामावरील दुसऱ्या मजल्यावर पतंग काढण्यासाठी गेलेला 13 वर्षीय प्रणव विनोद बोरकर जागीच मृत्यू ( boy died due to shock in Buldhana ) झाला आहे.
शॉक लागल्याने मृत्यू : प्रणवने पतंग काढण्यासाठी लोखंडी सळी घेतली व तो पतंग काढत असताना ती लोखंडी सळी विद्युत तारेला लागल्याने सदर मुलाचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पोलिसांचा तपास सुरू : सदरची बाब पोलिसांना कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मुलाला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता आणले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनाकरिता शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहे.