ETV Bharat / state

नांदेडातील भाविकांच्या कारचा बुलडाण्यात अपघात; १ ठार, ३ जखमी

नांदेडमधील दादगाव येथील भाविक कारने अजमेर येथे जाण्यासाठी निघाले होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरघाव ट्रक आणि कारमध्ये जोरदार धडक झाली.

author img

By

Published : May 29, 2019, 3:15 PM IST

अपघात

बुलडाणा - जिल्ह्यातील मलकापूरजवळ आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भरधाव ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. विश्वास संबाराव देवसरकर (वय ३५), असे मृताचे नाव आहे.

नांदेडमधील दादगाव येथील भाविक कारने अजमेर येथे जाण्यासाठी निघाले होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरघाव ट्रक आणि कारमध्ये जोरदार धडक झाली. वडनेरभोलजी जवळील ठाकुर पेट्रोल पंपाजवळ हा भीषण अपघात झाला. यामध्ये गजानन शंकर देवसरकर, लक्षण किसन देवसरकर, भारत किसनराव देवसरकर, चंद्रमणी मेहसराम सावनकर हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मलकापूरचे नगराध्यक्ष हरीश रावळ यांनी मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींमध्ये कुणाचा हात तर कुणाचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Intro:Body:बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर जवळ भीषण अपघात झाल्याची घटना आज बुधवारी समोर आली आहे. यामध्ये भरघाव ट्रक व कार अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाय़कल करण्यात आले आहे. यामध्ये एकाची प्रकृती ही चिंताजनक आहे.

महामार्ग ६ वर वडनेरभोलजीजवळ 29 मे बुधवारी सकाळी सहा वाजता हा अपघात घडला आहे. माहितीनुसार, दादगांव नांदेड येथील भाविक स्विप्ट डिझायर क्र. एम.एच.४७/सी.७४९८ या कारने अजमेर येथे जाण्यासाठी निघाले होते. बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास विरुद्ध दिशेने भरघाव आलेल्या ट्रक क्र. एम.पी.०९/एच.जी.५५९९ व कारमध्ये महामार्ग ६ वर वडनेरभोलजी नजीक ठाकुर पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात विश्वास संबाराव देवसरकर (३५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर गजानन शंकरराव देवसरकर, लक्षण किसनराव देवसरकर, भारत किसनराव देवसरकर, चंद्रमणी मेहसराम सावनकर हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मलकापूरचे नगराध्यक्ष हरिश रावळ यांनी तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यात तिघांपैकी कुणाचा हात तर कुणाचा पाय फॅक्चर असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.