ETV Bharat / state

भंडाऱ्यातील तरुणाने रानडुकराला दिली दोन तास झुंज - भंडारा रान डुक्कर झुंज

भावेशने रानडुकराला घट्ट पकडल्याचे लक्षात येताच इतर नागरिकही त्याच्या मदतीला धावले. वन विभागाची चमू पोहोचेपर्यंत रानडुकर पळून जाऊ नये, म्हणून भावेश त्याच्यावर बसून राहिला.

तरुणाची रानडुकराशी झुंज
तरुणाची रानडुकराशी झुंज
author img

By

Published : Jun 9, 2021, 7:39 PM IST

भंडारा - शहरात एका तरुणाच्या शौर्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. घराशेजारी घुसलेला रानटी डुकराबरोबर संघर्ष करून त्याला पकडले आणि तब्बल दोन तास त्याच्यावर बसून राहिला. त्यानंतर वन विभागाने त्याला पिंजऱ्यात जेरबंद करत जंगलात सोडले. विशेष म्हणजे याच डुकराने दोन लोकांना जखमी केले होते. शिवाय त्याला पकडताना तरुणाच्या हाताचे दोन बोटांना इजा झाली आहे.

तरुणाची रानडुकराशी झुंज

अचानक हल्ला झाल्यावरही दाखवले धैर्य

भंडारा शहरातीलमध्ये भागी असलेल्या शितला माता मंदीर परिसरात सकाळी 6 वाजल्या सुमारास रानडुकराने प्रवेश करत नागरिकांवर हल्ला चढविला. यात रजनी भरतसिंग भदोरीया (वय 55) यांना मांडी व पायावर टक्कर दिली. तर रुपेश किशन नेवारे (वय 22) यालाही जखमी केले. त्यामुळे नागरिक सैरावैरा पळू लागले. भावेश यावेळी घरी झोपलेला होता. भावेशच्या आईने त्याला बोलावल्यानंतर भावेश घराबाहेर निघाला. नेमके याचवेळी रानडुकर त्यावेळेस त्याच्या समोर दिसला. एरवी जंगली डुक्कर दिसताच नागरिक स्वतःचा बचाव करण्यासाठी पळून जातात. मात्र भावेश न घाबरता तिथेच थांबला. याचवेळी त्या रानडुकराने भावेशवर हल्ला चढविला. स्वतःला वाचवितांना त्याच्या 2 बोट जखमी झाले. मात्र तरीही भावेशने पळ न काढता शौर्य दाखवित रानडुकराशी झुंज सुरू केली आणि त्याची मान घट्ट धरली.

दोन तास दिली झुंज

भावेशने रानडुकराला घट्ट पकडल्याचे लक्षात येताच इतर नागरिकही त्याच्या मदतीला धावले. वन विभागाची चमू पोहोचेपर्यंत रानडुकर पळून जाऊ नये, म्हणून भावेश त्याच्यावर बसून राहिला. लोकांनी वनविभागाला फोन केल्यानंतर दोन तासाने वन विभागाचे कर्मचारी तिथे दाखल झाले आणि डुकराला पिंजरा बंद केले. या घटनेनंतर भावेशची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. सर्व जखमीना उपचाराकरीता सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा -बंधाऱ्यात बुडालेल्या तिघा भावंडांचे मृतदेह सापडले; सख्ख्या भावांची मिठी हृदय हेलवणारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.