भंडारा - जिल्ह्याच्या पालांदूर नजीकच्या गोंदी देवरी येथील तलावात बुडून मासेमाराचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अश्वदीप रामू शेंडे (वय २८) असे मृत मासेमाराचे नाव आहे.
हेही वाचा - विधानसभा निवडणुकीसाठी भंडारा जिल्हा प्रशासन यंत्रणा सज्ज
गोंदी देवरी तलावातील पाणी तलावाबाहेर जात असल्याचे पाहून तलावात टाकलेल्या जाळ्यातील मासे पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ नये, यासाठी तळ्यातील लावलेले जाळे व्यवस्थित करण्यासाठी अश्वदीप तलावात उतरला होता.
तलावाच्या तळाशी जाळे लावत असताना नाकातोंडात पाणी शिरल्याने तो बुडू लागला. तो बुडत असल्याचे नागरिकांना दिसताच अश्वदिपला वाचविण्याचे नागरिकांनी प्रयत्न केले. परंतु यात नागरिकांना अपयश आले.
हेही वाचा - भंडारा विधानसभा क्षेत्रात कोण मारणार बाजी?
घटनेची माहिती पालांदूर पोलीस ठाण्यात देण्यात आली असून माहिती मिळताच पालांदूर पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. अश्वदिपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.